पुणे- लोणावळा येथे गोल्ड व्हॅल्ली रोडवर, द लगुना रिसॉर्टच्या जवळ अवैध मदय विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, ने कारवाई करून २३ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याने येथे दिली आहे.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि,’दि.०६/०२/२०२४ रोजी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, डॉ. श्री. विजय सुर्यवंशी , व ,संचालक (दक्षता व अंमलबजावणी),प्रसाद सुर्वे ,व ,विभागीय उप- आयुक्त, श्री. धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत उप-अधीक्षकसुजित पाटील ,उत्तम शिंदे. व एस. बी. जगदाळे . यांच्या मार्गदर्शनाखाली . देवदत्त पोटे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे यांचे पथकाने अवैधपणे उच्च प्रतीचे विदेशी मदय बाळगुन विक्री हेतुने वाहतुक करतांना लोणावळा शहर हद्दीत, गोल्ड व्हॅल्ली रोडवर, द लगुना रिसॉर्टच्या जवळ, तुंगार्ली, ता. मावळ, जि. पुणे. या ठिकाणी कारवाई करुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम 65 (अ, बी, डी, ई), 80, 81, 83 व 90 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांचे ताब्यातुन उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या विविध बँडच्या 50 सिलबंद बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेले टाटा कंपनीचे काळया रंगाचे प्रवासी वाहन हॅरीअर क्र. एमएच 43 सी सी 9267 असा वाहनासह एकुण रु.23,15,330/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईत निरीक्षक बी विभाग विठ्ठल बोबडे . व निरीक्षक, तळेगाव दाभाडे संजय सराफ व दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे व डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सर्वश्री सुरज घुले, जयराम काचरा, शाहिन इनामदार, मुकुंद पोटे, चंद्रकांत नाईक, शरद हांडगर यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भरारी पथक क्र. १, पुणे चे दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे हे करीत आहेत. तसेच अशा प्रकारे अवैध मद्याबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.