पुणेः विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२४ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल २० सुवर्ण व १७ रौप्यपदकांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण १६ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा तर बीजेएस वाघोली संघाने ३ सुवर्ण व २ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला.
राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, साईचे प्रादेशिक संचालक पांडूरंग चाटे, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु व कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या प्रमुख उपस्थिती उद्धाटन झालेल्या या स्पर्धेत १५ क्रीडा प्रकारांत १४०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. बॅडमिंटनच्या महिला व पुरुष प्रकारांच्या अंतिम सामन्यात एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा पराभव करत कोथरूडच्या एमआयटी डब्लूपीयूने सुवर्ण कामगिरी केली. बुद्धिबळातील एमआयटी डब्लूपीयूचा वरचष्मा पहायला मिळाला. कारण पुरुषांत त्यांनी व्हीआयटीचा तर महिलांत एमआयटी एडीटीचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबाॅलच्या अंतिम सामन्यांतही डब्लूपीयू संघाने मुंबईच्या एसएमएमके संघाचा ५७-४१ अशा फरकाने धूव्वा उडवला तर महिलांत डब्लूपीयूने एमआयटी एडीटीचा ५२-४६ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक सोबत नेले. स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यजमान एमआयटी एडीटीच्या पुरुष संघाने पटकाविले. यात वेदांत कनोजीयाला सर्वोत्कृष्ट फलंदाज तर स्वामाभू स्वामीला सर्वोत्तम गोलंदाजाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात एनडीए खडकवासलाने संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरला ५-२ अशा फरकाने पराभूत केले. तर महिलांत एमआयटी डब्लूपीयूने एमआयटी एडीटी संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. कबड्डीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती व एमईएस गरवारे महाविद्यालय, पुणे यांनी जेतेपद पटकाविले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेच्या अन्य टेबल-टेनिस, टेनिस, व्हाॅलीबाॅल व वाॅटर पोलो या खेळांतही एमआयटी शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले. स्पर्धेचे बक्षिस वितरण सर्वांत तरुण महिला एव्हरेस्टवीर पुर्णा मालवत, मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू कॅप्टन राजेंद्र शेळके, एमआयटी एडीटी मिटकाॅमच्या संचालिका डाॅ.सुनिता कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले.
चौकटीतिरंदाजीत श्रुती गव्हाने, साक्षी बदडेला सुवर्णसंत ज्ञानेश्वर विश्वशांती डोमच्या लाॅनवर कंपाउंड व इंडियन बो प्रकाराचे तिरंदाजी सामने पार पडले. कंपाउंट पुरुषांत डी.वाय.पाटील पिंपरीच्या निखील वासेकर याने तर महिलांत एमआयटी एडीटीच्या श्रुती गव्हाने हिने सुवर्णपदकाचा वेध घेतला. तर इंडियन बो प्रकारात एमआयटी एडीटी बायो इंजिनिअरिंगच्या साक्षी बदडेने महिलांत तर पीसीसीओईच्या शुभम गांगुर्डे याने पुरुषांत सुवर्ण कामगिरी केली.
रोईंगमध्ये योगेश, स्नेहाची सुवर्ण कामगिरीविद्यापीठाच्या बोट क्लबवर पार पडलेल्या विविध गटांच्या इनडोअर रोईंग स्पर्धेच्या पुरुष व महिला सिंगल स्कल प्रकारात एमआयटी एडीटीच्या योगेश बोराले व स्नेहा सोळंखी यांनी १:१९.०६ व १:५५,०२ या वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर यासह डबल स्कल प्रकारात १:३२.६ वेळेसह तर ३-ईमध्ये १:३५.३ व मिक्स प्रकारात १:४४.७ अशा वेळेसह एमआयटी एडीटी बोट क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना वर्चस्व राखले.
बाॅक्सिंगध्ये एमआयटी एडीटीचेच वर्चस्वबाॅक्सिंक कोर्टमध्ये पार पडलेल्या विविध वजनी गटांच्या सामन्यांत यजमान एमआयटी एडीटी विद्यापीठाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. एमआयटी एडीटीच्या शुभम कार्ले याने फ्लाय वेट, अब्बास तांबोळीने हेवी वेट तर ओमकार जामदाडे याने सुपर हेवीवेट गटात बहारदार कामगिरी करताना सुवर्णठोसा लगावला. या सर्व खेळाडूंना ऑलिंपियन बाॅक्सर मनोज पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाला विजेतेपद’एमआयटी डब्लूपीयू’ स्पर्धेत दुसरे तर बीजेएस वाघोलीला तिसरे स्थान
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/