पुणे -श्रीहरीकीर्तानोत्तेजक सभा, पुणे या संस्थेचा प्रतिवर्षी होणाऱ्या महर्षि वेदव्यास नारदीय कीर्तन संमेलनाच्या शृंखलेत यंदा कीर्तन संमेलनाचा कार्यक्रम संस्थेच्या नारद मंदिरात झाला. दि. ३१ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत ,चार दिवस झालेल्या या १४ व्या संमेलनात सात कीर्तनकारांनी आपली कीर्तनसेवा श्रीनारदचरणी अर्पण केली. यासर्व कीर्तनकारांना आणि दोनही साथीदारांना शाल, श्रीफल, दक्षिणा आणि पदवी संस्थेकडून देण्यात आली.
या कीर्तन संमेलनाचे अध्यक्षस्थान मुंबईचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रवींद्र कवीश्वर यांनी भूषविले. त्यांच्याच कीर्तनसेवेने कीर्तन संमेलनाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी, कीर्तनाचे श्रोते, कीर्तनप्रेमी यांची मोठी उपस्थिती होती.
या पाठोपाठ दि ४ ते ७ फेब्रुवारी या काळात आयोजित श्रीहरीकीर्तानोत्तेजक सभा ‘वार्षिकोत्सव’यास दि ४ रोजी प्रारंभ झाला. याच्या उद्घाटन प्रसंगी ह.भ.प रवींद्रबुवा कवीश्वर (डोंबिवली),ह.भ.प अंजली जोशी (डोंबिवली), शरद्बुवा पाटणकर ,पुणे (हार्मोनियम) , पं . नचिकेत मेहेंदळे ,पुणे (तबला), लक्ष्मीप्रसादबुवा पटवारी (युवा कीर्तनकार- माजलगाव ,बीड ), व आनंदी कऱ्हाडकर
(युवती कीर्तनकार ,पुणे) यांना पुरस्कार देऊन गौरवले गेले.
शाल ,श्रीफळ ,दक्षिणा ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या कार्यक्रमाचे प्रारंभी कीर्तनकलानिधी ह.भ.प रामचंद्रबुवा भिडे यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे निवेदन व आभारप्रदर्शन जयश्री देशपांडे, प्रेमा कुलकर्णी यांनी अनुक्रमे केले. कार्यक्रमास कीर्तनप्रेमींची मोठी गर्दी होती .
दि . ७ फेब्रुवारीपर्यंत श्री न्रारद मंदिर ,सदाशिव पेठ येथे सायंकाळी रोज ६ते८ वेळात महोत्सवातील कीर्तनकारांची कीर्तने संपन्न होणार आहेत. यावेळी चिंतामणी निमकर (ऑर्गन), विजय दास्ताने (तबला),योगेश देशपांडे (तबला) यांची साथ लाभणार आहे.