पुणे- काही माध्यमे आणि वृत्त वाहिन्यातून पुणे लोकसभेसाठी दोघे इच्छुक असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत . मात्र केवळ हे दोघेच नसून अजून अनेक जन मनसे कडून पुण्याची लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे मनसे च्या नेत्यांनी येथे अधिकृतपणे सांगितले आहे.
मनसे कडून या बातम्यांच्या वरून असा खुलासा करण्यात आला आहे कि,’ आज काही वृत्तवाहिन्या वरून पुणे लोकसभे साठी काही नावे निश्चित करून ती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कडे पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ साठी मनसे निवडणूक पूर्व तयारी संपूर्ण महाराष्ट्र भर करीत आहे.त्या साठी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत तर नेते अमित ठाकरे अनेक दौरे करीत आहे पक्षाचे नेते ,सरचिटणीस,उपाध्यक्ष हे त्यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेल्या लोकसभा मतदार संघात कार्यरत झाले आहेत
त्याच बरोबर पक्षाच्या विविध पातळ्यांवर अनेक गोष्टी सुरू आहेत.या निवडणुकी साठी पुणे लोकसभा मतदार संघात पक्षात अनेक इच्छुक आहेत ही सर्वच मंडळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अत्यंत अनुभवी व उच्च क्षमतेची आहेत आणि ही नावे आघाडी वर आहेत,जनतेमधून याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत पण त्यांच्या जोडीने इतर ही काही नावे आहेत ज्याच्या बाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर विविध वेळा चर्चा सुरू असते , या गोष्टी प्रत्येक राजकीय पक्षात होत असतात , त्यामुळे उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय या प्रक्रियेला मनसे च काय इतर पक्षांना देखील अजून बराच वेळ लागणार आहे.
त्यामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या नावांच्या बरोबरीने आणखीन ही काही नावाची चर्चा भविष्यात होऊ शकते असे एकंदर परिस्थिती दर्शविते.