रायगड-पक्ष चोरणारे, फोडणारे, हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे का? मी हुकूमशाहीला हिंदुत्व मानणार नाही. मत तुमचे आणि किंमत त्यांना, हे चालणार नाही. तुम्हाला आता हिम्मत दाखवावी लागेल. असा घणाघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप करू नका.
मी कालपासून इथे आहे मी काय काय केले हे गिते साहेबांनी सांगितले. कोरोना काळात मी माझ कुटुंब माझी जबाबदारीची घोषणा केली होती पण त्याने पण काहींना डोकेदुखी आहे. काहीजण दारात जातात, तेव्हा लोक म्हणतात अरे हड… असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, रायगडने अनेकांना झुकवले आहे, तानाजी मालुसरे यांची ही भूमी आहे. इथे झेंडा बाजूला आणि नॅपकिन पुढे पुढे. जॅकेट घेतली पण काहीही झाले नाही भावी पालकमंत्री म्हणूनच राहिले, असे म्हणत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही गॅरंटी म्हणत नाही, आम्ही प्रामणिकपणे काम करतो. चौकशी करायची असेल तर मुंबई पालिकेची नको पीएम केअर फंडची करा. प्रफुल्ल पटेल तुमच्यासोबत आल्यावर त्यांच्यावरील कारवाईचे काय झाले. महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले नेते मुग नव्हे खोके गिळून गप्प झालेत. आता आपल्याला सर्व थोतांडाना उत्तर द्यायची आहेत, माझा पक्ष चोरला आता माझ्या लोकांच्या मागे लागलेत, असा खोचक टोलाही ठाकरेंना लगावला आहे.