पुणे- चक्क युवराज बेलदरे यांच्या बिल्डींग मध्ये भाड्याने राहून मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आशिष तानाजी मोरे, वय ३३ वर्षे या युवकास अटक करुन त्याचेकडुन चार दुचाकी गाड्या भारती विदयापीठ पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तसेच तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार यांना दुचाकी चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी यांना कात्रज, तलावाजवळ एक इसम नामे आशिष तानाजी मोरे, वय ३३ वर्षे, रा. सध्या रा. युवराज बेलदरे यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने, तिसरा मजला, फ्लॅट नंबर १०, वसंत मोरे यांच्या घराजवळ, कात्रज गावठाण, पुणे मुळ गाव मुपो भालकी, ता. बिदर, कर्नाटक हा दुचाकीवरुन फिरत असताना दिसुन आला. त्या इसमास दुचाकी गाडी क्रमांक MH42BC7295 हिच्यासह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपासामध्ये ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०५/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक ०१/०२/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासावरुन त्याचेकडुन २,५०,०००/- रुपये किंमतीच्या ४ दुचाकी गाड्या जप्त करुन खालील प्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०५/२०२४ भादंवि कलम ३७९
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०४/२०२४ भादंवि कलम ३७९
३. स्वारगेट पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४२/२०२४ भदंवि कलम ३७९
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार ,अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील ,सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन गाडे, धनाजी थोत्रे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.