घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कंत्राटी महिला सफाई सेविका सुवर्णा सोमनाथ पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाल्या १० वी पास: प्रशासनाने केला विशेष सन्मान…….!

Date:

पुणे-प्रभाग क्रमांक १२, रोकडोबा मंदीर आरोग्य कोठीकडे कंत्राटी पद्धतीत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या श्रीमती सुवर्णा पवारने रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ५५.२०% गुण प्राप्त केले. माहेरकडील नाव सुवर्णा लक्षमण अवघडे या कंत्राटी सफाई सेविकेचा वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल कांबळे, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी वैजीनाथ गायकवाड आरोग्य निरिक्षक राहुल शेळके, श्रीमती संगीता बदामी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, उदय सणस, निखिल निकम, राजेश रासकर, विनोद सरोदे, महेश जाधव, मोकादम राजू गायकवाड व इतर सर्व सेवक उपस्थित होते. सत्कार समारंभ प्रसंगी सुवर्णा पवार यांनी अशा भावना व्यक्त केल्या की,” सर्व साहेब, मोकादम व सेवक यांच्या पाठिंब्याने व मार्गदर्शनाखाली रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ५५.२०% गुण प्राप्त करून पास झाले ते सर्व श्रेय साहेब व माझ्या सोबत काम करणाऱ्या सेवकांना आहे.
सुवर्णा पवार यांची आई विमल व लक्ष्मण अवघडे या मोल मजूरी करणाऱ्या श्रमिक महिला..माहेरी ९ वी पर्यंत शिकलेल्या सुवर्णाचा विवाह मजूरी करणाऱ्या सोमनाथ पवार यांच्याशी झाला. अतिशय हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना शिकवता आले नाही शिवाय सासरी पण तशीच परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले.

यावेळी त्या म्हणाल्या ,’ पतीच्या घरी देखील अतिशय आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने १३ वर्षापूर्वी पतीचे अकाली निधन झाले त्यामुळे माझ्यावर खूप मोठे संकट आल्याने संसार कसा चालवावा व पोटाची खळगी कशी भरावी शिवाय मुलीचे शिक्षण कसे करावे असे प्रश्न माझ्यासमोर होते. मी घरात एकटीच असल्याने मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पर्यायी माझ्यावर आली त्यामुळे माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी व मुलीचा सांभाळ करण्यासाठी मला पाठीवर पोतं घेऊन कचरा वेचून धुणी भांडी धुणे, गंवड्याच्या हाताखाली सिंमेट कालवून, डोक्यावर चार ते पाच मजली वाळू व विटा वाहून, पडेल ते काम करून तुटपुंज्या मोलमजूरीतून संसाराचा गाडा चालवत आहे. तसेच पतीच्या निधना नंतर महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात सार्वजनिक स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीमध्ये महिला सफाई कामगार म्हणून कामाला लागले. सफाई कामगार असल्याने पुणे महानगरपालिका कामगार युनियन बरोबर संपर्क आला. युनियनने माझ्यात शिकण्याची जिद्द व उमेद निर्माण केली. म्हणून मला शिक्षण शिकून मला वेगळं काही तरी करायंच आहे शिवाय माझ्या एकूलत्या एका मुलीस पण शिक्षण शिकवणारच आहे तसेच इतर कामगारांनी पण शिक्षण शिकावं अशा भावना व्यक्त केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे-पिंपरीतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मास्टरप्लॅन…

आरएमसी प्लांट आता रडारवर:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली...

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर उच्चस्तरीय चर्चासत्र

​‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रह्मा रिसर्च...

चार सांघिक विजेतेपदांसह महावितरणचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय...