पुणे, भारत –7 मे 2026: कास्टिंग्ज आणि पिग आयर्नच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक, तसेच पोलाद आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडने (BSE: 500245, NSE: KIRLFER) आज चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 2025–26 चे आपले आर्थिक निकाल जाहीर केले.
चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर करताना, केएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. गुमास्ते म्हणाले, “KFIL ने या वर्षाचा समारोप चौथ्या तिमाहीतील अत्यंत दमदार कामगिरीसह केला आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आमच्या प्रमुख विभागांमधील विक्रीच्या प्रमाणात झालेली भक्कम वाढ आणि सुधारित कार्यक्षमता यामुळे ही कामगिरी आमच्यासाठी खास आहे. वर्षभर प्रतिकूल आर्थिक वातावरणाचा सामना करावा लागला असूनही, आमचा एकत्रित वार्षिक महसूल 5 टक्क्यांनी वाढून 6,889 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, अपवादात्मक बाबी वगळून करपूर्व नफा (PBT) 25 टक्क्यांनी वाढून 512कोटी रुपयांवर गेला आहे, तर वर्षाच्या सुरुवातीपासूनचा निव्वळ नफा (YTD PAT) लक्षणीयरित्या 22 टक्क्यांनी वाढून 358कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मार्च महिन्याच्या मध्यात सोलापूर एलपीजी पुरवठा खंडित झाल्यावर आम्ही वेगाने दिलेल्या प्रतिसादात आमची लवचिकता दिसून आली. पर्यायी इंधन उपायांचा वेगाने विचार करून, आम्ही केवळ चार दिवसात परिस्थिती पूर्ववत केली आणि आमच्या उत्पादन वेळापत्रकावर तसेच ग्राहकांना दिलेल्या आश्वासन पूर्ततेवर कमीत कमी परिणाम होईल, असा प्रयत्न केला.
भविष्याचा विचार करता, आमचे सर्व प्रमुख भांडवली प्रकल्प आणि धोरणात्मक विलीनीकरणे नियोजनानुसार सुरू आहेत. मूल्यनिर्मितीच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासाठी आम्ही दृढपणे वचनबद्ध आहोत. यात अधिक समृद्ध उत्पादन मिश्रणावर लक्ष केंद्रित करणे, नवीकरणीय ऊर्जेद्वारे खर्चात बचत करणे आणि जागतिक बाजारपेठेत आमचे स्पर्धात्मक स्थान मजबूत करणे यांचा समावेश आहे. ”
चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा स्वतंत्र आढावा:
| रुपये (कोटी) | Q4 FY 26 | Q4 FY25 | वार्षिक | YTD FY 26 | YTD FY25 | वार्षिक |
| महसूल | 1,781.0 | 1,736.2 | 3% | 6,783.9 | 6,566.3 | 3% |
| ईबीआयटीडीए* | 225.9 | 198.5 | 14% | 836.0 | 757.9 | 10% |
| ईबीआयटीडीएमार्जिन | 12.7% | 11.4% | 12.3% | 11.5% | ||
| पीबीटी# | 176.7 | 127.7 | 38% | 514.4 | 432.1 | 19% |
| पीएटी | 130.0 | 95.6 | 36% | 375.6 | 317.3 | 18% |
चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा एकत्रित आढावा:
| रुपये (कोटी) | Q4 FY 26 | Q4 FY25 | वार्षिक | YTD FY 26 | YTD FY25 | वार्षिक |
| महसूल | 1,817.2 | 1,737.0 | 5% | 6,888.6 | 6,564.2 | 5% |
| ईबीआयटीडीए* | 224.6 | 201.3 | 12% | 841.7 | 756.2 | 11% |
| ईबीआयटीडीएमार्जिन | 12.4% | 11.6% | 12.2% | 11.5% | ||
| पीबीटी# | 169.8 | 123.7 | 37% | 496.6 | 408.5 | 22% |
| पीएटी | 123.1 | 92.3 | 33% | 357.8 | 294.0 | 22% |
* इतर उत्पन्न आणि अपवादात्मक बाबी वगळून

