श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजन
पुणे : पुण्यात १०० व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे भव्य दिव्य आणि यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांचा आणि कलाकारांचा सन्मान श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आला.
कलाकारांच्या हस्ते यावेळी आरती करण्यात आली. कार्यक्रमासाठी मंगेश चव्हाण, अमर लांडे, विश्वास भोर यांनी सहकार्य केले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष दीपक थोरात आणि विश्वस्त उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अशोक जाधव तसेच कार्यकारिणी सदस्य सुरेश देशमुख, मोहन कुलकर्णी, अनिल गुंजाळ, शशिकांत कोठावळे,
मंदार बापट, योगेश सुपेकर, नितीन मोरे, रेश्मा परितेकर-मुसळे, सुरेंद्र गोखले, आशुतोष नेर्लेकर, राजेंद्र आलमखाने, निनाद जाधव, जतीन पांडे, चेतन चावडा,स्वीकृत सदस्य चंद्रशेखर भागवत, मंजुषा जोशी,पराग चौधरी, अभिजीत इनामदार समदखान पठाण, संदीप पाटील, प्रमोद रणनवरे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.