पुणे-राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त जनसंघर्ष समितीच्या वतीने गांधीजींना आदरांजली म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ते काँग्रेस भवन पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेस भवन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रा. विकास देशपांडे संपादित “व्यर्थ न हो बलिदान” या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीजींचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. देश अखंडीत राहण्यासाठी गांधीजींचे विचार तणाईपर्यंत पोहचविले पाहिजे. पुण्यामध्ये बरीच वर्षे आगाखान पॅलेसमध्ये महात्माजी व कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्ये होते. आगाखान पॅलेसमध्ये असताना गांधीजींचा सातत्याने पत्र व्यसवहार चालू असे. ‘चले जाव’ चळवळीनंतर इंग्रजानो भारत सोडा, स्वातंत्र्य द्या असा पत्रव्ययवहार चालू ठेवला. इंग्रजांना जनता स्वस्थ बसू देईना आंदोलन सतत चालू होते. अखेर १९४७ ला इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. अशा या महान मानवतावादी नेत्यास मी शतश: प्रणाम. करतो.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अजित दरेकर, लता राजगुरू, संगीता तिवारी, वाल्मिक जगताप, द. स. पोळेकर, दिपक निनारीया, सुरेश नांगरे, मारूती माने, अनिल अहिर, अनुसया गायकवाड, वैशाली रेड्डी, सोनिया ओव्हाळ, राज गेलोत, जनसंघर्ष समितीतर्फे ॲड रवि रणसिंग, प्रा. विकास देशपांडे, ॲड. संदीप ताम्हनकर, संतोष पवार, विनय गाडेवार तसेच डॉ प्रवीण सप्तर्षी, सौ. सप्तर्षी, सौ. देशपांडे, हरिभाऊ टिकेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.