नोकभरती पेपरफुटी प्रकरणी विशेष चौकशी समितीची आम आदमी पर्टीची मागणी
पुणे-आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, असा आरोप करत आम आदमी पार्टीने पुण्यात अलका टॉकीज ते गुडलक चौक “आक्रोश मोर्चा” काढून सरकारचे लक्ष वेधले
या वेळेस आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सदोष “तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात. नोकभरती परीक्षेत झालेल्या “पेपरफुटी”ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली “विशेष चौकशी समिती”ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा, पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत अश्या मागण्या केल्या.
हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा जाहीर इशारा सुदर्शन जगदाळे, शहर अध्यक्ष यांनी सरकारला देतो आहे असे संगितले .
देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा युवा आघाडीचे अमित म्हस्के यांनी केला.
आम आदमी पार्टीच्या आक्रोश मोर्चात पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे,
महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष कनिष्क जाधव पुरंदर अध्यक्ष दत्तात्रय कड,प्रवक्ते धनंजय बेनकर, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, शिक्षक आघाडीच्या शीतल कांडेलकर, स्मिता पवार, अक्षय शिंदे, सतीश यादव, अभिजित मोरे, अमोल मोरे, किरण कांबळे, प्रशांत कांबळे, विजय लोखंडे, मयुर कांबळे, गुणाजी मोरे, अख्तर खान, नितेश विश्वकर्मा,श्रद्धा शेट्टी,अनिल कोंढाळकर, किरण कद्रे , सय्यद अली, संदीप सोनवने, ॲड.अमोल काळे, निरंजन अडागळे, उमेश बागडे, हृषिकेश मारणे, हरीश चौधरी, पूजा वाघमारे, माधुरी गायकवाड, अनिश वर्गीस, अँन अनिश, रूपाली काळभोर, सुनिता बाविस्कर,साहिल परदेशी, प्रदीप उदागे, निलेश वांजळे, सचिन पवार, संतोष इंगळे, अमर डोंगरे, अजय सिंग, सुरेश भिसे, संजय कोणे, आसिफ मोमीन, प्रकाश आगवणे, कमलेश रानवारे, रूपाली नाईक, विक्रम गायकवाड, कुमार धोंगडे, मिलिंद सरोदे, मनोज शेट्टी, विशाल शेलार नितेश विश्वकर्मा, बळीराम शहाणे, रवी काळे, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, सरळ सेवा व स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.