YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

Date:

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि अधिक चांगल्या मालमत्ता गुणवत्तेसह चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 26 मधील मजबूत कामगिरी सादर

मुख्य ठळक बाबी:

  • बँकेने आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 44.7% वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी नफा 3,476 कोटी रु. होता. यात 44.5% ने वाढ झाली.
  • ठेवीनी 3 लाख कोटी रु. चा महत्त्वाचा टप्पा ओलांडून 3,18,969 कोटी रु. वर पोहोचल्या. यात वार्षिक 12.1% आणि 9.0% तिमाही वाढ
  • CASA गुणोत्तर 35.1% वर. आर्थिक वर्ष 25 मधील चौथ्या तिमाहीत 34.3% आणि आर्थिक वर्ष 26 मधील तिसऱ्या तिमाहीत 34.0%
  • एकूण ॲडव्हान्सेस 2,73,445 कोटी रु. वर, वार्षिक 11.1% वाढ
  • GNPA गुणोत्तर 1.3% वर, तिमाही ते तिमाही 20 bps ने घट आणि NNPA गुणोत्तर 0.2% वर, वार्षिक आणि तिमाही ते तिमाही दोन्हीमध्ये 10 bps ने घट
  • बँकेचा कामकाज नफा आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,618 कोटी रु. वर पोहोचला, वार्षिक 23.1% वाढ

मुंबई – 20 एप्रिल 2026: YES BANK ने चौथी तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये नफ्यात सातत्यपूर्ण वाढ, सुधारित मालमत्ता गुणवत्ता आणि वेगवान वाढ दिसून आली.बँकेचा तिमाही नफा 1,068 कोटी रु. होता. यात मागील वर्षाच्या तुलनेत 44.7% वाढ आहे, तर पूर्ण वर्षाचा नफा 3,476 कोटी रु. होता. हा 44.5% ने वाढला. आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत बँकेचे नेट इंटरेस्ट इनकम 2,638 कोटी रु. होते. त्यात वार्षिक  15.9% वाढ होऊन आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीसाठी नेट इंटरेस्ट मार्जिन्स वार्षिक 20 bps ने वाढून2.7% झाले. नॉन-इंटरेस्ट इनकम पूर्ण वर्षासाठी वार्षिक 15.4% ने वाढून 6,759 कोटी रु. झाले.

YES BANK चा आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीसाठीचा कामकाज नफा 23.1% वार्षिक ने वाढून 1,618 कोटी रु. झाला. बँकेचा खर्च-उत्पन्न गुणोत्तर 63% पर्यंत सुधारले. ते  आर्थिक वर्ष 25 मधील 67.3% पेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीमध्ये मालमत्तेवरील परतावा (RoA) 1.0% होता, जो आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 0.7% च्या तुलनेत जास्त आहे. एकूण ठेवी 12.1% वार्षिक वाढून 3 लाख कोटी रु. चा टप्पा ओलांडत 3,18,969 कोटी रु. वर पोहोचल्या. CASA ठेवी 14.9% वार्षिक ने वाढून 111,959 कोटी रु. झाल्या. CASA गुणोत्तर 35.1% होते. आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीतील 34.3% च्या तुलनेत जास्त आहे.

एकूण ॲडव्हान्सेस 2,73,445 कोटी रु. वर होती. मागील वर्षाच्या तुलनेत 11.1% ने वाढली. सर्व ग्राहक विभागांमध्ये वाढ दिसून आली:

• रिटेल बँकिंग ॲडव्हान्सेस: 4.7% वार्षिक वाढ

• कमर्शियल बँकिंग ॲडव्हान्सेस: 14.5% वार्षिक वाढ

• कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्युशनल बँकिंग ॲडव्हान्सेस: 19.7% वार्षिक वाढ
• रिटेल मालमत्ता वितरण ~41% वार्षिक

YES BANK देशभरात आपला विस्तार सुरू ठेवत आहे. आर्थिक वर्ष 26 दरम्यान, बँकेने 82 नवीन शाखा उघडल्या. त्यायोगे भारतभरातील एकूण शाखा नेटवर्क 1,334 शाखांपर्यंत पोहोचले. शाखांव्यतिरिक्त, बँक 249 बिझनेस करस्पॉन्डंट (BC) बँकिंग आउटलेट्सद्वारे कार्यरत आहे. बँकेकडे 1,364 एटीएम, कॅश रीसायकलिंग मशीन (CRMs) आणि बंच नोट अॅक्सेप्टर्स (BNAs) देखील ग्राहकांच्या सोयीसाठी 24×7 उपलब्ध आहेत.

YES BANK ची मालमत्ता गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली असून ग्रॉस NPA गुणोत्तर 30 bps वार्षिक ने घटून 1.3% झाले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीत NNPA गुणोत्तर फक्त 0.2% होते, जे वार्षिक आणि तिमाही ते तिमाही दोन्हीमध्ये 10 bps ने घटले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेने 81.9% चा मजबूत प्राव्हिजन कव्हरेज रेशो राखला. आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीमधील 79.7% च्या तुलनेत अधिक आहे.

निकाल आणि आर्थिक कामगिरीबाबत भाष्य करताना YES BANK चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय एम टोंस म्हणाले, “YES BANK ने आर्थिक वर्ष 26 ची सांगता मजबूत पायावर केली. Q4 RoA 1.0% साध्य करत आमच्या मार्गदर्शनाशी सुसंगत कामगिरी केली, ज्याला NIMs मध्ये 20 bps सुधारणा, खर्च-उत्पन्न गुणोत्तरातील सुधारणा आणि आर्थिक वर्ष 20 नंतरचे सर्वात कमी GNPA आणि NNPA स्तर यांचे पाठबळ होते. व्यवसायातील गती अधिक बळकट होत राहिली, ॲडव्हान्सेस आणि ठेवींमध्ये व्यापक वाढ झाली. त्याला मजबूत CASA-आधारित ठेवी प्रणालीने आधार दिला. त्यामुळे ठेवींचा खर्च कमी झाला. आर्थिक वर्ष 26 मध्ये महत्त्वाचे धोरणात्मक टप्पे गाठले गेले. त्यामध्ये SMBC आमचा सर्वात मोठा भागधारक बनला. त्यायोगे बँकेच्या दीर्घकालीन क्षमतेवरील जागतिक संस्थात्मक विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. आर्थिक वर्ष 27 कडे आपण वाटचाल करत असताना आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये फ्रँचायझी मजबूत करणे, उच्च-गुणवत्तेच्या वाढीला गती देणे आणि सर्व भागधारकांसाठी सातत्यपूर्ण मूल्य निर्माण करणारी सक्षम YES BANK उभारण्याच्या प्रवासाला पुढे नेणे यांचा समावेश आहे.” या तिमाहीदरम्यान, YES BANK ला S&P Global Sustainability Yearbook 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आले. हा सन्मान मिळवणारी ही एकमेव भारतीय बँक आहे. आणि सलग तिसऱ्या वर्षी FTSE4Good Index Series मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. बँकेला सलग चौथ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क® म्हणूनही मान्यता मिळाली. जोडीला YES BANK ने प्रीमियम बिझनेस ग्राहकांसाठी YES Grandeur Business यांसारख्या नवीन योजना सादर केल्या आणि तंत्रज्ञान व नाविन्यपूर्णता यामधील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी ACIC Launchpad उपक्रम सुरू केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिका...

‘त्या’महिलेचा VDO चित्रित करणाऱ्या पत्रकारांना भाजपाकडून धमक्या, म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२६.. भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर...

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...