२०२३ चे महिला आरक्षण बिल त्वरीत लागू करा,भाजपने खोटा प्रचार बंद करावा-स्वाती शिंदे, अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस

Date:

पुणे : भारतीय जनता पक्षाने खोटा प्रचार बंद करून संसदेने २०२३ साली मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी आज बुधवारी केली .

पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ., आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो., महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा’., आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे., आदी घोषणांचे फलक महिला आंदोलकांनी हातात घेतले होते.

महिला आरक्षणाचे श्रेय उपटण्याचा मोदी सरकारचा खटाटोप केविलवाणा आहे. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून महापालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले.

या आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई,दि. २२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व...

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा पण …

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा - मुख्यमंत्री...

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

मुंबई, : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी....