रेड कॉर्नर नोटीस:तरीही ७ महिन्यापासून निलेश घायवळचा ठावठिकाणा लागेना

Date:

पुणे : गँगस्टर निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टवर परदेशात आपल्या कुटुंबासह गेला. दरम्यान, पुण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर व त्याच्या टोळीवर दाखल झाला. पोलिसांनी त्याचा बनावट पासपोर्ट, व्हिसा रद्द केला. इंटरपोलमार्फत त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. तरीही गँगस्टर निलेश घायवळ यांचा ठावठिकाणा अद्याप म्हणजे चक्क 7 महीने उलटले तरी लागलेला नाही.

१८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा पुण्यातील कोथरुडच्या मुठेश्वर चौकाजवळ निलेश घायवळ टोळीने रस्ता न दिल्याने एका तरुणावर गोळीबार केला. त्यात प्रकाश धुमाळ हा तरुण जखमी झाला होता. त्यानंतर घायवळ टोळीने आणखी एकावर हल्ला करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेला १८ एप्रिल २०२६ रोजी ७ महिने पूर्ण होत आहे. पोलिसांनी नीलेश घायवळच्या भावासह त्याच्या टोळीतील अनेक गुंडांना अटक केली. परंतु, अजूनही नीलेश घायवळ कोठे आहे, याचा पत्ता लागू शकलेला नाही.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या म्हणण्यानुसार कोथरुडमध्ये नीलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तो परदेशात गेल्याचे समजले. त्यानंतर त्याने बनावट पासपोर्ट बनविल्याचे समजल्यावर तो पासपोर्ट आपण रद्द केला. त्याचा व्हिसा रद्द केला आहे. इंटरपोलच्या मार्फत आपण त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. कायद्याच्या दृष्टीने त्याच्या शोधासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पोलिसांनी पूर्ण केल्या आहेत. अजूनही तो नेमका कोठे आहे, याचा शोध लागू शकलेला नाही. त्याचा व्हिसा ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध होता. त्यानंतरही तो अद्याप भारतात परत आलेला नाही. त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

कोथरुड पोलिसांनी मयुर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मॉटी व्यास आणि दिनेश पाठक या पाच जणांना कोथरुड येथील गोळीबार प्रकरणी अटक केली आहे. त्या सर्वावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वारजे पोलीस ठाण्यात नीलेश घायवळ व त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह १३ जणांवर ४५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातही मोक्का कारवाई करण्यात आली आहे. नीलेश घायवळ याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे पिस्टल व जिवंत काडतुसे सापडली. लोणावळ्याहून त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे ४०० काडतुसे सापडली होती.

पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो लंडनला असल्याची सर्वप्रथम माहिती मिळाली. गेल्या २७ वर्षांपासून त्याच्यावर गुन्हे दाखल असताना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळाला, याची चौकशी केल्यावर त्याने अहिल्यानगर येथून गायवळ असे नाव लावून पासपोर्ट व व्हिसा मिळविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करविला. काही वेळा तो स्वीतझरलँडला गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत ब्रिटिश उच्चायुक्तांकडे याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ सध्या लंडन मध्ये आहे. तो ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध असलेल्या व्हिजिटर व्हिसावर तेथे थांबला आहे. घायवळचा मुलगा लंडनमधील शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याने व्हिसा घेतला होता. त्याचा वैध व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो अद्याप हाती लागला नाही. सध्या पोलीस युके सरकाकडे त्याच्या प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.