मिडीयाला मेसेज :
कॅन्टोन्मेंट अग्निशामक केंद्र शेजारी असलेल्या या धार्मिक स्थळा मध्ये असलेले बांधकाम प्रकरणी आररएसएस पुरस्कृत भाजप सरकार जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.तसेच, पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरातील Christian Marathi Church शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ११ वाजता पोलीस बंदोबस्तात कॅन्टोन्मेंटचे अधिकारी चर्च पाडण्यासाठी येणार असल्याचे समजते.या कठीण प्रसंगी, डिजिटल व प्रिंट मीडिया यांनी ख्रिस्ती समाजाबरोबर ठामपणे उभे राहावे,अशी विनंती करणारे मेसेज एक दिवस अगोदर म्हणजे १६ एप्रिल ला पास्टर रॉबिन महाडकर,पास्टर सुहास गायकवाड,पास्टर संदीप गायकवाड यांच्या नावाने वकील तोसीफ शेख यांनी मिडीयाला पाठवले होते .
तत्पूर्वी २३ मार्च रोजी पुणे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी ,या ठिकाणी आम्ही बांधकाम पाडण्याची कारवाई १७ एप्रिल ला सकाळी ११ वाजता करणार आहोत असे स्वारगेट पोलिसांना दिले होते आणि संबधित ठिकाणी चिटकवले होते .

या नुसार काल १७ एप्रिल २०२६ रोजी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शिलोह मराठी चर्च ऑफ ख्राईस्ट, धोबी घाट, कॅन्टोन्मेंट अग्निशामक केंद्र शेजारी, शंकरशेठ रोड येथील चर्चवर पाडकामाची (demolition) नोटीस देऊन प्रत्यक्ष कारवाईसाठी अधिकारी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीसह दाखल झाले.मात्र या कारवाईच्या विरोधात मोठ्या संख्येनेपुरुष , महिला वर्ग तसेच विविध स्तरांतील नागरिक घटनास्थळी एकत्र जमले. उपस्थित नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने या कारवाईचा निषेध नोंदवून चर्चला पाठिंबा दर्शविला. तसेच अॅड. तोसिफ शेख यांनी चर्चच्या वतीने कायदेशीर बाजू मांडत व इतरांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून पाडकामाच्या कारवाईस सोमवारपर्यंत स्थगिती (stay) देण्यात आली आहे.

