रसिकांनी घेतला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अवीट गोडीच्या गीतांचा आस्वाद

Date:

पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गायकी अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या मैफलीत रसिकांनी अवीट गोडीच्या गीतांचा आनंद घेतला.

सुरेल प्रस्तुत ‘डिव्हाईन लता’ या मैफलीचे आयोजन पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. प्रसिद्ध पार्श्वगायिका डॉ. देविका दामले आणि डॉ. मोहिका दामले यांनी लतादीदींची एकाहून एक लोकप्रिय गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले होते तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले होते. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, संहिता आणि निवेदन डॉ. गौरी दामले यांचे होते. ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी ज्यांची फोड होते त्या म्हणजे लतादीदी असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

पेशाने डॉक्टर असलेल्या या भगिनींनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सत्यम, शिवम सुंदरम’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करत ‘आएगा आनेवाला’, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’, ‘हवा मे उडता जाए’, ‘चंदन सा बदन’, ‘जीवनात ही घडी’, ‘अपलम-चपलम’, ‘लटपट-लटपट तुझं चालणं’, ‘इक प्यार का नगमा है’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या’, ‘लग जा गले’ अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ या शिवस्तोत्राने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विविध गीतकारांनी लिहिलेल्या आणि तितक्याच ताकदीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या या हिंदी-मराठी रचना सादर करणाऱ्या या भगिनींना उपस्थितांनी वन्स मोअर देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. 

प्रसिद्ध गायक राजेश दातार, अनिल घाटगे, प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रदिप देसाई, डॉ. सतीश देसाई, धनंजय दैठणकर, आनंद सराफ, दिलीप कुंभोजकर, अभय नाझरे, विवेक जडे, सतीश दवे आदी मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...