‘पीएमआरडीए’ घरकुलांची बुधवारी सोडत!

Date:

  • १,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र
  • आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार प्रक्रिया; ‘म्हाडा’च्या प्रणालीद्वारे पारदर्शकता

पुणे/पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील गृहप्रकल्पातील शिल्लक १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवारी (८ एप्रिल २०२६) सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत ५,३१७ पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार असून, ‘पीएमआरडीए’ने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या गृहयोजनेसाठी एकूण ५,३६७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर ५० अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ५,३१७ अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब आजमावतील.

ही सोडत प्रक्रिया ‘म्हाडा’ने विकसित केलेल्या ‘IHLMS २.०’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘पीएमआरडीए’च्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे.

सदनिका आणि पात्र अर्जदारांची स्थिती :

  • पेठ क्र. १२ (EWS): ८१ सदनिकांसाठी २,१८२ अर्जदार
  • पेठ क्र. १२ (LIG): ३९३ सदनिकांसाठी १,९७५ अर्जदार
  • पेठ क्र. ३०-३२ (EWS): ३२७ सदनिकांसाठी ४५६ अर्जदार
– पेठ क्र. ३०-३२ (LIG): २२८ सदनिकांसाठी ७०४ अर्जदार

थेट प्रक्षेपणाची सुविधा :
सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. या प्रक्रियेची ‘यूट्यूब लिंक’ (YouTube Link) सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...