मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाला गती,जागा हस्तांतरणासाठी प्रयत्न; तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण होणार

Date:

पुणे: मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठेला साजेसं भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाचे नेते व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, उमेश कांबळे, जयदेव रंधवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्य सरकारकडून स्मारकाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्मारक उभारणीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता शक्य तितक्या लवकर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चर्चेनंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त करत, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, मंगळवार पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार आहे. हा लढा पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक सामाजिक चळवळ म्हणून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोप दुर्दैवी असून, स्मारक उभारणी हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातीं:तज्ज्ञ समिती स्थापन करणार

– मंत्री ॲड.आशिष शेलार मुंबई, – महाराष्ट्रात लैंगिक अपराधास प्रवृत्त...

पावसाळी गटारे की ड्रेनेज लाईन? गोंधळामुळेच नागरिकांची दिशाभूल

विशेष लेख | शरद लोणकर पाऊस सुरू झाला की पुण्यातील...

गुजरातमध्ये पूरस्थिती; १९ जणांची सुटका, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर

अहमदाबाद / मुंबई | प्रतिनिधी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार...

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच...