उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; परशुराम वाडेकरांचा गजब दावा

Date:

पुणे:महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण कधी कधी काही बैठकांना महापौरांच्या शेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही.अशी गजब खदखद उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान वाडेकर देखील उपमहापौर पद मिळाल्यावर सिनिअर कार्यकर्त्यांना देखील विचारत नसल्याची चर्चा झडते आहे.जे लोक आज मान-सन्मानाची अपेक्षा करत आहेत, त्यांनी कधी सामान्य, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तो सन्मान दिला आहे का? लहान कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते किंवा अगदी वरिष्ठ कार्यकर्त्यांनाही योग्य मान दिला गेला का? असे ही सवाल केले जात आहेत.
दरम्यान, वाडेकर यांनी असेही म्हटले आहे की,शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नाही.उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र आता त्या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार महापालिकेचे उपमहापौर वाडेकर यांनी केली. वाडेकर यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या निमित्ताने उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही, असेही वाडेकर यांनी सांगितले.

महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांसाठी उपमहापौरपद सोडले असले तरी या पदासाठी असलेला सन्मान मात्र भाजपकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौर यांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून होते. महापौर कार्यालयातील संबधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगत महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते. मात्र त्यानंतरही पुन्हा तशाच पद्धतीचे प्रकार घडत असल्याचे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

: 🔴 १४ जूनचा प्रयत्न फसला... १८ जूनला झाला घात?⚠️...

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे |...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.