Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 रहिमतपुरातील राम मंदिर किर्तनात मुस्लीम तबलावादकाची साथसंगत

Date:

रहिमतपूर (जि. सातारा) – २८ जानेवारी २०२३

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त संपूर्ण रहिमतपूर रामोत्सवात रंगल्याचे पहायला मिळाले. येथील प्राचिन श्रीराम मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. खास म्हणजे, रहिमतपुरकरांनी संपूर्ण देशाला आदर्श वाटावे अशी कृती करुन सर्वांचीच मने जिंकली आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रहिमतपुरातील तिन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तर, प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या दिवशी राम मंदिरातील किर्तनात मुस्लीम तबलावादकाने सहभाग घेऊन जय श्रीरामचा नारा दिला.

अयोध्येतील नव्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही संपूर्ण देशवासियांसाठी जणू अस्मितेची बाब होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्सव काळात स्वच्छतेचे आवाहन केले. रहिमतपूरकरांनी त्यास भरभरुन दाद दिली. म्हणूनच येथील श्रीराम मंदिरासह जैन मंदिर आणि मशिदीतही स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. अशा प्रकारे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये स्वच्छता उपक्रम घेऊन रहिमतपूरकरांनी देशभरात मैलाचा दगड प्रस्थापित केला. तसेच, या उपक्रमामुळे रहिमतपुरात खऱ्या अर्थाने चैतन्य पसरले. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापणा सोहळा असल्याने रहिमतपुरात जणू रामोत्सवच साजरा झाला. 

श्रीराम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे मंदिराला आकर्षक सजावट केली. लक्षवेधी रोषणाई हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमयी बनले. सकाळपासूनच भाविकांनी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशेष किर्तनाचे आयोजन करण्यात आले. कोरेगाव येथील ख्यातनाम किर्तनकार श्रीमती पौर्णिमा नातू यांनी किर्तनातून श्रीरामांच्या जीवनकार्याविषयी प्रबोधन केले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्रीरामांची आरती करण्यात आली. त्याचवेळी अयोध्येतील सोहळा सुरू झाला असतानाही भाविकांनी मंदिरात आरतीसाठी गर्दी केली. आरतीनंतर भाविकांची दर्शनासाठी भली मोठी रांग बघायला मिळाली. याच काळात श्रीराम नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. भगवे कपडे, भगवी टोपी, भगवे झेंडे या साऱ्यामुळे मंदिराचा परिसर भगवा झाला होता. भाविकांनी उत्स्फुर्तपणे प्रसाद आणून त्याचे वाटप केले. 

याप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा श्रीमती चित्रलेखाताई कदम, अरुण माने, अशोक लोखंडे, जनार्दन किरपेकर, राजू टांकसाळे, संतोष नाईक, जगन्नाथ तारखे, सचिन भंडारी, निलेश माने, रणजित माने, श्रेयस टांकसाळे, सतीश भोसले आदी उपस्थित होते.

अठराव्या शतकात जीर्णोद्धार
येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात करण्यात आला आहे. त्यावेळी हे मंदिर कमंडलू नदीत होते. नदीला वारंवार पूर येत असल्याने भाविकांना श्रीरामांचे दर्शनही घेता येत नसे. त्यामुळे नव्याने मंदिर बांधून तेथे मूर्ती स्थापित करावी, असे वचन कै. गंगाधरपंत शेंडे यांनी त्यांच्या वडिलांना दिले होते. त्यानुसार गंगाधरपंत यांनी ते वचन पूर्ण केले. अतिशय देखण्या अशा या मंदिरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची सुबक मूर्ती स्थापित करण्यात आली. कै. गंगाधर शेंडे हे डॉ. राजेंद्र शेंडे यांचे आजोबा आहेत. हे मंदिर रहिमतपूरकरांचे श्रद्धास्थान आहे. सोमवारी याठिकाणी अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला.

शेख यांचे ४० वर्षांपासून तबलावादन
नातू यांच्या किर्तनावेळी पिंप्री येथील दादा कदम यांनी हार्मोनिअम तर मुबारक शेख यांनी तबल्याची साथसंगत केली. शेख हे गेल्या ४० वर्षांपासून तबला वादनाचे कार्य करतात. त्यांचे आजोबा आणि वडिल हे सुद्धा तबलावादक होते. अब्दुल अमीन शेख या वडिलांकडूनच त्यांनी तबल्याचे धडे घेतले. श्रीराम मंदिरातील उत्सवासाठी जायचे असल्याने त्यांच्यामध्येही विशेष उत्साह होता. प्रभू श्रीराम हे केवळ कुणा एका धर्माचे नसल्याची प्रचिती यानिमित्ताने सर्वांना आली. त्यामुळेच त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. रहिमतपूरने स्वच्छता आणि किर्तन सोहळ्याद्वारे संपूर्ण भारतातच वेगळेपण सिद्ध केले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

8000 कोटीच्या थकीत कर्जामुळे 6 बँका संकटात

मुंबई: दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही...

मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्यातील तिघांचा मृत्यू

पुणे:मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला...

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे...