पुणे-एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य असणारी लोकशाही कशी अस्तित्वात आली?, भारतात मतदानाचा अधिकार कसा व कधी मिळाला?, कुठलीही भाषा-भेद-लिंग-प्रांत याचा भेद न मानता संविधान कस तयार झाल? , महामानवांच्या लढा व वारकरी परंपरेचे प्रतिबिंब संविधानात कसे आहेत? असा विविध प्रश्नाची उत्तरे तरुणाईने जाणून घेतली. निमित्त होते प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकायत आयोजित संविधान जागर अभियानाचे. हे अभियान २६ जानेवारी रोजी संध्या ६ वा संभाजी गार्डन परिसरात झाले. यासोबतच या अभियानात स्त्री पुरुष समानता, आर्थिक विषमता नसावी यासाठी संविधानातील कुठली कलमे आहेत हे उपक्रमाद्वारे उपस्थितांनी जाणून घेतलं. समता–न्याय–बंधुतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी तसेच संविधानानाने आपल्याला हक्क व अधिकार काय दिले आहेत, नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय हे जाणून घेण्यासाठी सातत्याने विविध सार्वजनिक ठिकाणी ‘संविधान जागर अभियान’ राबवत असतो असे उपक्रमाचे समन्वयक ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले. अभियानाच्या शेवटी सामूहिकपणे संविधानाच्या प्रास्ताविकेच वाचन केल. या उपक्रमाला तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
संविधान साक्षरता अभियानाद्वारे संविधानाचा जागर
Date: