पुणे : संसदीय कायद्यांतर्गत स्थापित झालेल्या दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वतीने जून २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स’ (सीएमए) परीक्षेसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असल्याची माहिती आयसीएमएआय पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे यांनी दिली.
बारावी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए) हा अभ्यासक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. वाणिज्य, कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘सीएमए’साठी प्रवेश घेता येतो. बारावीनंतर फाऊंडेशन, तर पदवीधर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा द्यावी लागते. जून २०२४ मध्ये या परीक्षा होणार आहेत.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ ही अंतिम तारीख आहे. परीक्षा, अभ्यासक्रम व प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आयसीएमएआय पुणे चॅप्टर, सीएमए भवन, कर्वेनगर, पुणे या पत्त्यावर, तसेच ०२०-२५४७९७९२, २५४७९७९३ संपर्क साधावा किंवा https://icmai.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आयसीएमएआय पुणे चॅप्टरतर्फे कळविण्यात आले आहे.