प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयआणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘जनसंवाद सत्र

Date:

पुणे, 5 मार्च 2026

“नागरिक देवो भवः” या भावनेतून प्रेरित होऊन, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पुणे पोलीस यांच्या समन्वयाने बुधवारी (4 मार्च 2026) प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे विशेष संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ आयोजित करण्यात आले. वेळेत पासपोर्ट जारी होण्यासाठी पोलीस विभाग आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

पारपत्र अर्जांशी संबंधित तक्रारी, विशेषतः पोलीस पडताळणी अहवाल (PVR) संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे पोलिसांचे अधिकारी यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि अनेक प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ निराकरण करण्यास मदत केली.

सत्रादरम्यान अर्जदारांना पासपोर्ट अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, न्यायालयामध्ये चालू असलेले खटले  आणि पत्यांमधील बदल इत्यादी प्रकरणांबाबत तपशीलवार मार्गदर्शन देण्यात आले.

या संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ मुळे नागरिकांना पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रकरणांतील विलंब कमी होण्यास आणि पोलीस पडताळणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत झाली.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय,पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम करण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन; सुटका होण्याची शक्यता

मुंबई-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या...

संजय राऊत यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या तब्बेतीची केली विचारपूस

पुणे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय...

राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र...

मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार:आदित्य ठाकरेंची घोषणा; शरद पवार गटाचा पाठिंबा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल,...