पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

Date:

‘तारीख पे तारीख’ नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार

मुंबई– केंज येथील पंतप्रधान आवास योजनेतील शासकीय अनुदानाच्या सवाचार कोटीच्या घोटाळ्याच्या नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तराने भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगुंटीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारत माता माझी आई, पण इथे डोके ठेवायला जागा नाही
, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात भ्रष्ट अधिकारी आणि संथ न्यायप्रक्रियेवर जोरदार प्रहार केला. केवळ चौकशीच्या नावाखाली भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘गरीबों के सम्मान में, मोदीजी मैदान में’. मात्र, जर सरकारी अधिकारी जनतेच्या पैशांची लूट करत असतील, तर त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हायलाच हवी. चौकशी पूर्ण होईपर्यंत किंवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधित दोषी अधिकाऱ्याला पदावरून निलंबित का केले जात नाही? असा रोकडा सवाल त्यांनी विचारला. जोपर्यंत अशी कडक पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण होणार नाही. हायकोर्टात 56 लाखांहून अधिक केसेस प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या माध्यमातून निकाल लागायला 50 वर्षे लागतील, अशी जनभावना झाली आहे. त्यामुळे ‘कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण तोपर्यंत संबंधित व्यक्तीला घरी बसवा’, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
तुम्ही किमान एवढे तरी उत्तर द्या की, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत संबंधित दोषी व्यक्तीला निलंबित केले जाईल का? निकालाला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण भ्रष्टाचाऱ्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...