पुणे-मार्केटयार्ड व कोंढवा भागात कारवाई करुन परदेशी नागरीकासह इतर तीन इसमांकडुन ८,२८,८००/- रु किचा मॅफेड्रॉन (एम.डी.) व कोकेन हे अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केले आहे .जोसेफ रोतीमी JOSEF ROTIMI(वय ३० वर्षे, रा. रिदीम चर्च, मिरा रोड, मुंबई मुळ-परदेशी नागरीक),जावेद अजीज सय्यद( वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं.३, सनराईस बेकरी जवळ, मिठा नगर, कोंढवा व रूम नं.४, चाळ नं. ३७, अंधेरी, सबवे मुंबई)मोहम्मद रफिक हशिम शेख(, वय ४७ वर्षे, रा. बि विंग, किन्जा अपार्टमेन्ट, कनकिया मिरा रोड, ठाणे, मुंबई) ,शेबाज शब्बीर कुरेशी(वय २४ वर्षे, रा. वडाला आर.टी.ओ. ट्रान्झेस कॅम्प चाळ, गल्ली नं.१६ रूम नं.१६, मुंबई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत .
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडील पोलीस निरीक्षक, श्रीमती. अनिता हिवरकर व पोलीस स्टाफ असे मार्केटयार्ड व कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात दि.२०/०१/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार, योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार वास्तुश्री बिल्डींग समोर, हाईडपार्क पितळे नगर रोड मार्केटयार्ड पुणे येथील सार्वजनिक ठिकाणी परदेशी नागरीक नामे जोसेफ रोतीमी. (JOSEF ROTIMI), वय ३० वर्षे, याचे ताब्यातुन ६,२८,८००/- रू किची ३१ ग्रॅम ४४ मिलीग्रॅम कोकोन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द मार्केटयार्ड पो.स्टे गु.र.नं. ०९/२०२४, एन.डी पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दि.२३/०१/२०२४ रोजी पोलीस अंमलदार, अझिम शेख यांना मिळालेले बातमीनुसार लेन नं ३०,
भाग्योदय नगर, कोंढवा, पुणे समोरील सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) जावेद अजीज सय्यद, वय ३७ वर्षे, २) मोहम्मद रफिक हशिम शेख, वय ४७ वर्षे,याचे ताब्यातुन २,००,०००/- रु किचा १० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.८१/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) २२ (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक, श्रीमती. अनिता हिवरकर यांचे पथकाकडील पोलीस अंमलदार, चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीनुसार पुणे स्टेशन परिसरात इसम नामे शेबाज शब्बीर कुरेशी, वय २४ वर्षे, याचे ताब्यात घेऊन त्याचेकडुन १,६९,६००/- रू किचा ८ ग्रॅम ४८ मि.ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं.२३/२०२४, एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, (अति. कार्यभार) अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा. पो.आयुक्त, गुन्हे २, सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, श्रीमती. अनिता हिवरकर, पोलीस उप-निरीक्षक-दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार, योगेश मांढरे, अझिम शेख, चेतन गायकवाड, साहिल शेख, संदिप जाधव, रविंन्द्र रोकडे, महेश साळुंके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.