‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत पहिल्या टप्प्याचे २० जानेवारी रोजी आयोजन; एकूण अंतर ९१.८ किलोमीटर

Date:

टी.सी.एस सर्कल, हिंजवडी येथून सुरुवात ते डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे समारोप

पुणे, दि. १९ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक एकच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी येथून सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची प्रशासनाकडून सखोल पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जागतिक नकाशावर यावीत, त्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार असून काही कालावधीसाठी मार्ग बंदही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून स्पर्धा दुपारी १ वाजून ३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी फेज-३ येथून सुरू होईल. त्यानंतर माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास या टप्प्याचा समारोप होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...