भारती विदयापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी
पुणे-केवळ मौजमजेसाठी रिक्षा चोरून फिरविणाऱ्या सादीक अलताफ शेख, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर ०१, भराडे वरती, आशीयाना हाईटस, चौथा मजला, येवलेवाडी, पुणे याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या २ रिक्षा भारती विद्यापीठ पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत .
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अनिल भोसले, हर्षल शिंदे यांना कात्रज स्मशान भुमीजवळ एक इसम चोरीची रिक्षा घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज स्मशान भुमी येथे गेले असता तेथे इसम नामे सादीक अलताफ शेख, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर ०१, भराडे वरती, आशीयाना हाईटस, चौथा मजला, येवलेवाडी, पुणे हा त्याचे ताब्यात रिक्षा क्रमांक एम.एच./१२/क्यु आर./३०५८ हिच्यासह मिळुन आला. सदर रिक्षाबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २२/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासावरुन त्याचेकडुन ३,००,०००/- रुपये किंमतीच्या दोन रिक्षा जप्त करुन खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत..
. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०/२०२४, भादंवि कलम ३७९
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२३, भादंवि कलम ३७९
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार,रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,. श्रीमतीः स्मार्तना पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा.नंदिनी वग्याणी , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गिरीशकुमार दिघावकर, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अनिल भोसले, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, बापु भिंगारे, विठ्ठल चिपाडे, मिलींद गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी. राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.