खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना उद्या ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. बारमती ॲग्रोमध्ये कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. त्या नंतर ईडीच्या वतीने आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नुसार रोहित पवार यांना उद्या ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मात्र, या दरम्यान रोहित पवार यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. इतकेच नाही तर या दरम्यान रोहित पवार यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयांवर मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. या कंपनीचे संचालक आमदार रोहित पवार हे आहेत. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयात ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्या नंतर त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली. त्या नुसार रोहित पवार यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वात पक्षात फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पक्षात आपले स्थान मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. या ईडी चौकशीदरम्यान देखील रोहित पवार समर्थनांमार्फत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील ईडी कार्यालयाभोवती गर्दी राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑगस्ट 2019 च्या एफआयआरमधून समोर आलं आहे. आमदार रोहित पवार यांची बारमती अॅग्रो कंपनी आहे. बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. तसेच 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. नोटीसीनंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहेत.