पुणे :- युवासेना पुणे शहर आयोजित शिवसेना नेते व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे युवा खेळ समीट चे उदघाटन आज सकाळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते सणस ग्राउंड , सारसबाग येथे करण्यात आले . तसेच उद्या दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे युवा खेळ समीटला सणस ग्राउंड येथे भेट देऊन युवकांशी संवाद साधणार आहेत .
युवा खेळ समीट च्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, बॉक्सिंग, ऍथलेटिक्स, शरीरसौष्ठव , रस्सीखेच अश्या विविध खेळांचे प्रकार असून पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्यातून हे खेळ घेतले जात आहेत .
उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार शशिकांत सुतार , चंद्रकांत मोकाटे,
युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक, निलेश बडडे, हर्षद कारकर, राजेश पळसकर, अविनाश बलकवडे, रेणुका साबळे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, सनी गवते, शहर समन्वयक युवराज पारीख , प्रसाद बांबर, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, अमोल देवळेकर, राजेंद्र शिंदे , अशोक हरणावळ, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, सविता मते, युवती अधिकारी निकिता मारटकर, गायत्री गरुड, मृण्मयी लिमये, अनंत घरत, मकरंद पेठकर , असंख्य शिवसैनिक आणि क्रीडापटू, क्रीडाप्रेमी उपस्थित होते .