पुणे- शहरअंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा यांनी सुमारे पावणे दोन लाखाचे मॅफेड्रॉन पकडले आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमा कडुन १,६९,६००/- रु किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर हया व पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २०/०१/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन परिसरात, पुणे येथील सार्वजनिक ठिकाणी रोडवर इसम नामे शेबाज शब्बीर कुरेशी, वय २४ वर्षे, रा वडाला आर.टी.ओ. ट्रान्झेस कॅम्प चाळ, गल्ली नं १६ मुंबई याच्या ताब्यातुन ८ ग्रॅम ४८ मि.ग्र. मॅफेड्रॉन (एम.डी.) किं.रु.१,६९,६००/- चा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. येथे गु.र.नं. २३/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, अपर पोलीसआयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ ,सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, रविंन्द्र रोकडे, महेश साळुंके, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
पावणे दोन लाखाचे मॅफेड्रॉन पकडले
Date: