सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ ची रिलीज तारीख जवळ आली असून आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. 25 जानेवारी.2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अॅक्शन शैलीची पुनर्परिभाषित करण्यासाठी फायटर तयार आहे. रोमांचकारी हवाई सीक्वेन्स आणि उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत स्टार-स्टडेड ट्रेलर लॉन्च इव्हेंट झाला असून दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि कलाकार सदस्य हृतिक रोशन, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांनी हजेरी लावली होती.
https://www.instagram.com/p/C2T-PCKokjY/
चित्रपटाचं काउन्ट डाऊन सुरू झाल असून चाहते हृतिक रोशन आणि कलाकारांना रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी वाट बघत आहेत. Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे सिद्धार्थ आनंदच्या फायटरची निर्मिती केली आहे.