अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ स्टारर “बडे मियाँ और छोटे मियाँ”च्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि अश्यातच या चित्रपटाचा टीझर येणार असल्याचा बातम्या समोर येत आहेत. 2024 च्या ईद ला हा बहुचर्चित चित्रपट येणार आहे. सूत्रानुसार 24 जानेवारी 2024 रोजी एक भव्य टीझर येणार असल्याचं कळतंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा टीझर केवळ एक झलक नाही तर ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’च्या सिनेमॅटिक विश्वात खळबळ माजवणार आहे. खिलाडीसह अक्षय कुमार आघाडीवर असून सर्वात तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफसह या बहुप्रतीक्षित चित्रपट घेऊन येणार असून तरुण स्टारचा “टायगर इफेक्ट” सगळयांना अनुभवयाला मिळणार आहे. 100 सेकंदांहून जास्त यात व्हिज्युअल ट्रीट असणार असून उच्च-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचे कॅरेक्टर बिल्ड अप बघायला मिळणार आहेत.
जशी टीझर लॉन्च जळव येत आहे तसा “टायगर इफेक्ट” बघायला मिळणार आहे. टायगर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”बडे मियाँ आणि छोटे मियाँ” च्या पलीकडे टायगर श्रॉफचा सिनेमॅटिक प्रवास रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” आणि रोहित धवन दिग्दर्शित “रॅम्बो” सोबत Marflix Pictures च्या अंतर्गत हा चित्रपट येणार आहे.