~ 2BHK ची ५०% पेक्षा जास्त नोंदणी आणि 2BHK निवासस्थानांची पूर्ण विक्री~
~ २ दिवसांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व मागणी दिसून आली आणि बहुसंख्य युनिट्सची संभाव्य घरमालकांना विक्री करण्यात आली ~
~2bhk, 3bhk आणि 3bhk डुप्लेक्स यांचा समावेश असलेली २०० हून अधिक युनिट्स सादर~
पुणे-१९जानेवारी २०२४: प्रीमियम रिअल इस्टेटमध्ये आघाडीवर असलेल्या मंत्राला मुंढवा जंक्शनच्या महत्वपूर्ण स्थळी असलेल्या मंत्रा मॅग्नस या त्यांच्या नवीनतम लक्झरी योजनेच्या जबरदस्त यशाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या वाटप कार्यक्रमाने, मंत्रा मॅग्नसने आधुनिक शहरी राहणीमानात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.
मंत्रा मॅग्नसने निवासस्थानाची पुनर्कल्पना केली आहे आणि पुण्यातील भारदस्त आणि महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांसाठी एक आरामदायी जीवनशैलीसाठीचे साधन तयार केले आहे. जीवनातील निरंतर विकासाचे प्रतीक अशा “जीवन वृद्धी भव” या संकल्पनेने प्रेरित असा हा प्रकल्प आरामशीरपणा आणि कार्यक्षमता यांची सुंदर जोडणी करतो. वास्तुशास्त्रीय रचनेमध्ये अत्याधुनिक सुविधा, विस्तीर्ण हिरवीगार जागा आणि शहरी जीवनाची नस बरोबर पकडणारे डिझाईन आहे.
२ दिवसीय वाटप कार्यक्रमाला १६० हून अधिक ग्राहक आणि असंख्य वॉक-इनसह विलक्षण प्रतिसाद मिळाला. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 2 BHK अपार्टमेंट्सची संपूर्ण विक्री झाली. त्यांची सुरुवात ८६.९९ लाख रुपयांपासून होती. त्याआधी त्यांची ५०% हून अधिक नोंदणी झाली होती. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी बहुतांश 3 BHK युनिट्सची (किंमत १.१५ कोटी रु.पासून) आणि डुप्लेक्स युनिट्सची (१.३८ कोटी रु.पासून सुरू होणारी) विक्री झाली. या प्रकल्पात १५० कोटी रु. हून अधिक विक्री झाली.
विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेले मंत्रा मॅग्नस २०० पेक्षा जास्त लक्झरी युनिट्स सादर करते. विशेषत: आयटी, बँकिंग आणि वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण आणि कृतीशील व्यावसायिकांच्या जीवनशैलीच्या गरजा पुरविण्याच्या दृष्टीने या युनिट्सची रचना करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुले असलेली तरुण विवाहित जोडपी 3 BHK आणि डुप्लेक्स युनिट्स यांना अधिक पसंती देताना दिसून आले. सुधारित जीवनशैलीसाठी त्यांच्या आकांक्षांशी उत्तम प्रकारे सुसंगत अशी ही युनिट्स आहेत.
मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहित गुप्ता म्हणाले, “मंत्रा मॅग्नसने आरामशीर जीवनशैलीसाठी अभूतपूर्व मागणी अनुभवली आहे. आमच्या रहिवाशांना विलक्षण आरामशीर अनुभव मिळेल हे सुनिश्चित करत आम्ही प्रत्येक पैलू ‘जीवन वृद्धी भव’ या संकल्पनेसह तयार केला आहे. या वाटप कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून पुण्यातील चोखंदळ व्यावसायिक आणि संभाव्य गृहखरेदी करणार्यांमध्ये मंत्रा मॅग्नसने विश्वास आणि आकांक्षा चेतवली असल्याचे दिसून येते.”
मंत्रा मॅग्नसने आपल्या किमतीच्या धोरणासह लक्झरीमध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. आता पूर्णपणे विक्री झालेले २ बीएचके युनिट्स ८६.९९ लाख रुपयांपासून उपलब्ध होते. 3 बीएचके आणि डुप्लेक्स युनिट्स अनुक्रमे १.१५ कोटी रु. आणि १.३८ कोटी रु. पासून, उपलब्ध असून त्यापैकी अनेक युनिट्सची आधीच विक्री झालेली आहे.