Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तुम तो धोखेबाज़ हो वादा करके…:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ट्विट केलेला अजित पवार यांचा VIDEO तुफान व्हायरल

Date:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटद्वारे पवार गटाने अजितदादांवर शरद पवारांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. तसेच शब्द जपून वापरायचे असतात आणि कायम लक्षातही ठेवायचे असतात, असा खोचक सल्ला दिला आहे.येत्या 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने एका ट्विटद्वारे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये शरद पवार गटाने अजित पवारांच्या काही जुन्या व्हिडिओची क्लिप पोस्ट केली आहे. तसेच दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द, असा त्यांना उपरोधिक टोमणाही मारला आहे.

दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय!शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात, असे शरद पवार गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.शरद पवार गटाने पोस्ट केलेल्या व्हिडिओत अजित पवार यांच्या जुन्या भाषणांचा समावेश आहे. एका क्लिपमध्ये अजित पवार म्हणतात की, ‘आधीपासूनच शब्दाचा पक्का म्हणून माझी ओळख आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कुणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही’. एके ठिकाणी ते ‘या मोदीला हटवा’, असेही बोलताना दिसून येतात.

एक क्लिप अजित पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत काय भूमिका मांडली त्याविषयीची आहे. त्यात ते या पदावर आपण कामच करू शकत नाही, तो प्रश्नच येत नाही, असे म्हणताना दिसत आहेत. त्याच्या पुढच्या क्लिपमध्ये सुनील तटकरे अजित पवारांचा उल्लेख “आपले राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री, असा करताना दिसत आहेत.

ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला…

सर्वात शेवटच्या क्लिपमध्ये अजित पवारांनी शिवसेनेतील पक्षफुटीनंतर शिंदे गटावर टीका करताना केलेला उल्लेख दिसत आहे. अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, पक्ष वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं, असं ते म्हणताना दिसून येत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...