रिंग रोडमधील जमिनींबाबत नागरिकांना त्रास देणाऱ्या 3 महिला तलाठ्यांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे -शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराच्या प्रतीसाठी नागरिकांना त्रास देऊन लाच मागणार्‍या तीन महिला तलाठ्यांवर खडक पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे.. हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली .

हवेली तालुक्यातील सांगरुळ तलाठी प्रेरणा बबन पारधी (वय ३०, रा. जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), बहुली गावाच्या तलाठी दिपाली दिलीप पासलकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, काकडेनगर, कोंढवा), खडकवाडी गावच्या तलाठी शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (वय ४०, रा. कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी) अशी कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत.
याबाबत एका ४२ वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यांना सांगरुण, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या हवेली तालुक्यामधील गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्ताविक रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या ७/१२ तसेच आठ अ उतारचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रती हव्या होत्या.

त्यासाठी ते सांगरुळ येथे कार्यरत असलेल्या प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दीपाली पासलकर, तसेच खडकवाडी, कुडजे येथील तलाठी शारदादेवी, पाटील यांना भेटले. त्यावेळी सांगरुळ गावातील त्यांना आवश्यक असलेल्या ७/१२ च्या व आठ अच्या उतार्‍याच्या २४० प्रतीसाठी पारधी यांनी त्या प्रतीसाठी असलेल्या सरकारी फीच्या व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयांची लाच मागितली. बहुली गावातील आवश्यक असणार्‍या ७/१२ व उतार्‍याच्या आवश्यक असणार्‍या १०६ प्रतिसाठी दीपाली पासलकर यांनी सरकारी फि व्यतिरिक्त ४ हजार ९१० रुपयांची लाच मागितली. तसेच खडकवाडी व कुडजे गावातील आवश्यक असणार्‍या ७/१२च्या व उतार्‍याच्या ३२ प्रतिसाठी शारदादेवी पाटील यांनी सरकारी फी व्यतिरिक्त १५२० रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांनी १९ सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

या तक्रारीची पडताळणी तीनही तलाठींकडे केली. त्या प्रेरणा पारधी यांनी सरकारी फी ३६०० रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारी अगोदर ४ हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. आणखी १२ हजार ४०० रुपयांची लाच मागितली.

दिपाली पासलकर यांनी सरकारी फी १५९० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडे ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करुन ती रक्कम प्रेरणा पारधी यांच्याकडे देण्यास सांगितले.

शारदादेवी पाटील हिने सरकारी फी ४८० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडून तक्रारीपूर्वी १५०० रुपये घेतल्याचे कबुल करुन आणखी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर २५ सप्टेंबर रोजी सापळा रचला. शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह, ग्राम महसूल अधिकारी सजा कुडजे यांचा शिक्का, मोबाईल व रोख ११०० रुपये मिळून आले. सर्व तीनही आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.