पुणे-शरद मोहोळ खून प्रकरणात पोलीस तपास समाधानकारक नाही. या गुन्ह्याला 12 दिवस होऊन ही कटाचा मुख्य सूत्रधार पकडला गेला नाही. या गुन्ह्यात आर्थिक हितसंबंध असल्याने राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात पोलिसांवर आहे. या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे ( एनआयए) देण्यात यावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारी २०२४ ला पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढणार असल्याचे आज येथे भाजपचे माजी नगरसेवक आणि हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे आणि हिंदू आघाडीच्या अन्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
किनारा हॉटेल मध्ये खूना पूर्वी काही आरोपी एकत्र जमले होते पण त्याचे हॉटेल मधील सीसीटीव्ही मिळून येत नाही. विदेशी बनावटीचे पिस्तूल गुन्ह्यात वापरले गेले आहे. असे हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
एकबोटे म्हणाले, मोहोळ हे गोरक्षक यांना मदत करत असल्याने अनेक तरुण गोरक्षणात सहभागी होत होते. दहशतवादी कातील सिद्दीकी याचा मोहोळ यांनी येरवडा कारागृहात खून केला होता. दहशतवादी संघटना वेगवेगळ्या नावाने कार्यरत असून ते एकमेकांच्या संपर्कात आहे. पुण्यात दहशतवादी मिळत असून त्याचे खुनात काही धागेदोरे आहे का? याबाबत तपास करण्यात यावा. हा खून सामान्य घटना नाही.यामागे आंतरराष्ट्रीय कट आहे. हिंदुत्व विरोधी लोकांनी काही जणांचा वापर करून हा स्थानिक गुन्हा असल्याचे भासविण्यात येत आहे.मात्र, याला राजकीय संबंध आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी हा गुन्हा टोळी युद्धातून झाला नसल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील सूत्रधार यांना लवकर पकडण्यात यावे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या प्रकरणात दररोज वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. यादरम्यान या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटना देखील समोर आल्या आहेत.