सुहास शिरवळकर मराठी लेखकांमधील रॉकस्टार : वैभव जोशी

Date:

‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणिवांविषयी प्रगल्भता पावलोपावली जाणवते. त्यांच्या कवितांमधून अर्थपूर्णता, तत्त्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते. माझ्या दृष्टीने मराठी लेखकांमधील रॉकस्टार म्हणजे सुहास शिवळकर होत, असे गौरवोद्‌गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले. सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यसेवेसी तत्पर लेखक होते. भाषेची गोडी लावणाऱ्या साहित्यिकांपैकी एक साहित्यिक म्हणजे शिरवळकर. स्वत:चा शोध घेण्याची जाणीव तसेच कल्पकता आणि शोधक नजर शिरवळकर यांच्या कवितांमध्ये दिसते, असे मत प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे सुहास शिरवळकर यांच्या ‘अस्तित्व’ आणि ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि. ३०) वैभव जोशी आणि सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे मंचावर होते. कार्यक्रम टिळक रोडवरील संचेती सभागृहातील नितू मांडके हॉलमध्ये झाला.

वैभव जोशी पुढे म्हणाले, शब्दबंबाळ न होता कुठे थांबायचे हा गुण शिरवळकर यांच्या कवितेत दिसून येतो. माझे व्यक्तीमत्त्व बदलण्याचे काम शिरवळकर यांच्या कथांमुळे झाले. मी त्यांच्या साहित्यकृतींमधून जगायला शिकलो. शिरवळकर यांच्या लेखनात दृश्यात्मकता असल्याने विविध ठिकाणांचे समग्र दर्शन घडते. माझ्या दृष्टीने शिरवळकर म्हणजे एक ते ५१ क्रमांकावर असलेले एकमेव साहित्यिक आहेत. त्यांच्या दीपस्तंभाची उब मी सोलापूरात राहूनही घेत राहिलो. ज्या लेखकाच्या लेखनाने मी वेडावला जाऊन वाचनालयातून पुस्तके लंपास करू लागलो ते माझे आवडते लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत.
सुबोध भावे म्हणाले, आवडत्या लेखकाची कादंबरी प्रकाशनापूर्वी वाचायला मिळणे आणि त्याचे प्रकाशन आपल्या हस्ते होणे म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद इतरांना देण्याआधी आजीने चव बघायला देण्यासारखे आनंददायी आहे. ‘अस्तित्व’ या कादंबरीतून नाटकाविषयी झालेले खोलवर व उत्कट लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले गेले आहे. त्यामुळे पुढील काळात ही कादंबरी विद्यापीठाच्या नाटक विभागात अभ्यासक्रमात येऊ शकते.
शालेय व महाविद्यालयीन काळात आम्ही सुहास शिरवळकर यांच्या कथा-कादंबऱ्या नुसत्याच वाचल्या नाहीत तर त्यांच्या कथांमधील पात्रं जगलो आहोत, असे सुबोध भावे यांनी आवर्जून सांगितले.
राजीव बर्वे यांनी सुहास शिरवळकरांबरोबर असलेले मैत्र उलगडत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. वाङ्‌मय चोरीचा एकही आरोप नसलेला लेखक म्हणजे सुहास शिरवळकर होत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अभ्यासपूर्ण लेखनातून कथानक गुंफत वाचकांची उत्कंठता वाढवत त्यांना गुंतवून ठेवणे ही शिरवळकर यांच्या लेखनाची उल्लेखनीय शैली होय, असेही ते म्हणाले.
पुस्तक निर्मितीस सहाय्य करणारे राजीव जोशी, अजित सातभाई, श्रीनिवास भणगे यांचा सत्कार सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत मधुमिता बर्वे, राजीव बर्वे यांनी केले.
सुहास शिरवळकर यांच्या साहित्यकृतींवर भरभरून प्रेम करणारे वाचक व सुहृद मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रबोध शिरवळकर यांनी केले तर आभार सम्राट शिरवळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीचा बैलगाडी मोर्चा

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे...

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...