सीवायडीएचा रौप्य महोत्सवात युवक दिन उत्साहात साजरा मॅथ्यू मॅटम लिखित ‘ट्रेड द रोडलेस ट्रॅव्हल्डः जर्नी इज द डेस्टीनेशन’ पुस्तक प्रकाशित
पुणे,दि.१४ जानेवारी:”सुरक्षित व स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ही मूलभूत मानवी गरज आहे. परंतू वाढती लोकसंख्या, शहरीकरण, शेती, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील पाण्याच्या वाढत्या गरजेमुळे याची मागणी वाढतच जाईल. भविष्यात कोट्यावधी लोक या मूलभूत सेवांपासून वंचित राहतील. अशा वेळेस केंद्र व राज्य सरकारला ज्या स्वयंसेवी संस्था सहकार्य करीत आहेत ते कौतुकास्पद कार्य आहे.” असे विचार नीती आयोगाचे अतिरिक्त अभियान संचालक आंनद शेखर यांनी व्यक्त केले.
सेंटर फॉर युथ डेव्हलमेंट अॅण्ड अॅक्टिव्हिटीज (सीवायडीए) च्या रौप्य महोत्सवां निमित्त येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह आयोजित येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह आयोजित करण्यात आलेल्या पाणी, आरोग्य,स्वच्छता वॉश या शिखर परिषदेत मुख्य अतिथि म्हणून ते होते.
या प्रसंगी वॉटर अॅण्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी व्ही.के.माधवन व वॉश विशेषज्ञ महेश मिश्रा उपस्थित होते. तसेच सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम, येरवडा येथील नगरसेवक अविनाश साळवे, नेपाळचे संतोष शहा, अखिलेश साहू, अर्णवाज दामानिया, सीवायडीएचे अध्यक्ष दिलमेहेर भोला, उज्वल चौधुरी व कार्यकारी संचालक प्रविण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम लिखित ‘ट्रेड द रोडलेस ट्रॅव्हल्डः जर्नी इज द डेस्टीनेशन’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘२५ युवकांना यंग अचिवर्स अवॉर्ड’ या विशेष पुरस्काराने सम्मान करण्यात आला.
आनंद शेखर म्हणाले,”हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची टंचाई वाढण्याचा अंदाज आहे. पायाभूत सुविधा आणि स्वच्छता सुविधांमध्ये गुंतवणूक, पाण्याशी संबधित परिसंस्थांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार व सर्वांसाठी सुरक्षित व परवडणार्या पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छता शिक्षण हे आवश्यक आहे.”
“समाजातील काही घटक आज ही शौचालय आणि जल व्यव्यस्थेपासून वंचीत आहेत. त्यासाठी गरजुंनी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करावा किंवा थेट जलशक्ती मंत्रालयातही वेबसाईटवर संपर्क साधू शकता.”
सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम म्हणाले,” युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मनामनात सामाजिक कार्याबद्दल प्रेरित केले जाते. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यात येते. नोकरी मागणारे नाही तर देणारे बनवितो. या संस्थेचे कार्य मुख्यतः दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवन उत्थानासाठी केले जाते. वर्तमानकाळात २५ तरूणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करून दिले आहे. ”
अविनाश साळवे म्हणाले,” कोविडच्या काळात संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधाबरोबरच त्यांना मानसिक आधार दिला. देशात प्रथमच या ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले होते.”
आयोजित वॉश शाश्वतता, नवे तंत्रज्ञान, शोध आणि नवकल्पना या विषयावरील चर्चासत्राची अध्यक्षता वॉश तज्ज्ञ महेश मिश्रा, प्लॅन इंडियाचे कार्यकारी संचालक मोहम्मद आसिफ, सेव द चिल्ड्रेनचे कार्यक्रम संचालक संजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये वॉश शाश्वतता, वॉशमधील नवीन तंत्रज्ञान आणि वॉश मधील अत्याधुनिक शोध व नवकल्पना या विषयावर उद्बोधन करण्यात आले. इकोसन सर्व्हिस फाउंडेशनचे संचालक डॉ. दयानंद पानसे, सीएसआर व्यवस्थापक अभिजित पाटील, वॉश मित्रा छत्तीसगडच्या राधा धिवर, युनिसेफचे वॉश ऑफिसर आनंद घोडके, आयआयटी मुंबईचे गौरव कापसे, सौरभ पंड्या, अभिषेक चौधरी, ललित शर्मा, करोन शैवा युसूफ कबीर आणि ज्योत्स्ना बहिरट उपस्थित होत्या.
कार्यकारी संचालक प्रविण जाधव यांनी प्रस्तावना मांडली.
कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी एम.एन.सणीयाल, निटेश सिंगरूळ, शहाजी गडहीरे, प्रिया कोठारी व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.
अनुज आणि रूची यांनी सूत्रसंचालन केले. दिल मेहर भोला यांनी आभार मानले.
बॉक्स
युवा महोत्सव साजरा
सीवायडीएच्या परिषदेत साजरा करण्यात आलेल्या युवक दिनाचे उद्घाटन सचिव शांताराम बडगुजर यांनी करून युवकांना आव्हान केले की वातावरणातील बदलांसाठी कार्य करावे. न्या.वसंत कांबळे यांनी मूलभूत हक्क व शिक्षणाचा अधिकार कायद्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रियांका शेंडगे, फरीदा लांबे, मंदार पोकळे, शिक्षक दत्तात्रय वारे, सुरेश खोपडे, अॅथनी छेत्री, अधिवक्ता वर्षा देशपांडे, समीर नाबर, शशिकांत बोराट, गिरीजा तुळपुळे व रश्मी श्रीवास्तव यांनी समाज व युवकांसमोरी समस्या व उपायांवर विचार मांडले.

