पुणे-शहर स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी 20 वा क्रमांक असताना यावर्षी देशात 10 क्रमांक मिळाला आहे. हे सर्वेक्षण 40 निकषांवर घेण्यात आले. त्याचे ‘रँकिंग’ केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागतो. मागील वर्षी पुण्याचा 20 वा क्रमांक होता.
पुणे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात दहावे. एक लाख लोकसंख्येच्या वर 10 वे आणि दहा लाख लोक संख्येच्या वरील शहरात देशात नववा क्रमांक मिळवला आहे. पुणे मनपाला 5 स्टार रँक मिळाले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, घन कचरा विभाग प्रमुख संदीप कदमयांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.
वर्षभरामध्ये शहर स्वछतेच्या बाबतीत विविध उपाययोजना केल्या आहेत. कचऱ्याचे क्रोनीक स्पॉट शोधून ते नष्ट करणे, रोजचा कचरा रोज गोळा करणे, 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया, अतिरिक्त मनुष्यबळ, सार्वजनिक शैचालयाची नियमित स्वछता असे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांची साथ मिळत आहे. नागरिकांच्या सहकाऱ्याने येत्या काळात पहिला क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेस असे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचे प्रयत्न, त्याला नागरिकांची साथ मिळत आहे. शहर स्वचतेसाठी येत्या काळात अनोखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी विविध संस्थांचा सहभाग देखील वाढवण्यात येणार आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून देशात पुणे महापालिका अग्रक्रमी राहावी यासाठी प्रशासन झोकून काम करेल, असा विश्वास घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी व्यक्त केला.

