रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न

Date:

रुद्रांग वाद्य पथकाचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे, – रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने भव्य वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा ग्राउंड झीरो, दत्तवाडी कमानी शेजारी चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री – महाराष्ट्र राज्य,आमदार- कोथरूड) यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती पुनित दादा जोशी (सरचिटणीस, पुणे भाजपा) व श्री पराग ठाकूर सर (अध्यक्ष,ढोल ताशा महासंघ) सामाजिक कार्यकर्ते अमोल शुक्ला व भरत अमदापुरे उपस्थित होते. कार्यक्रमास पुणे शहरातील विविध पथकांतील पदाधिकारी, वादक, तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाद्यपूजनासोबतच नवीन सराव सत्राचा प्रारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) – (संस्थापक, अध्यक्ष रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे हे गेली 9 वर्षांपसून गणेशोत्सव, पालख्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी या पूजन सोहळ्याने अधिकच जोमाने सुरू झाली आहे. वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्यातील रंगीत वेशभूषा, पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा नाद, आणि विविध सांस्कृतिक घटकांचे दर्शन याने उपस्थितांची मने जिंकली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या हस्ते महापौर बंगल्यातील श्रीगणरायाची आरती

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त...

गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन अडचणीत...

शनिवारवाड्यावर १६ ते १८ सप्टेंबर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम.

पुण्यात ‘राज्य सांस्कृतिक महोत्सवा’तून गणेशोत्सवाचा सांस्कृतिक जागर पुणे (दि....

अतिदुर्गम सिरोंचा तालुक्याच्या आणखी दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तेलंगणामधून पर्यायी व्यवस्था

संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून वीजयंत्रणेच्या कामांचा आढावा  मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...