शहर अध्यक्षांच्या एककल्ली पणाचा शरद पवार गटाला दणका
पुणे – माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, माजी उपमहापौर बंडू गायकवाद , माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक हेमलता मगर, आजित ससाणे, प्रसाद बाबर, अशा मान्यवर कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सर्वाधिक झटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. शहर अध्यक्षांच्या मनमानीला कंटाळून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मान्यवरांनी अजितदादांच्या दिमतीला जाणे पसंत केल्याचे येथे सांगण्यात आले. माजी आमदार महादेव बाबर तर दीर्घ काळापासून उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते त्यांनी आज अजितदादांचा हात धरला.शहर अध्यक्ष पदावरून दीपक मानकर पायउतार झाल्यावर अजितदादांना पक्ष संघटना पुण्यात मजबूत करायची असल्याने सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांना शहर अध्यक्ष केल्यावर आता ठाकरे आणि शरद पवार यांचे समर्थक खेचून नेण्याचे राजकारण सुरु झाले आहे. एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे विरोधकांमधील ठराविक नेत्यांची गटबाजी यामुळे सत्ताधारी पक्ष कडे प्रवेश करणारांचा ओघ वाढतो आहे.दरम्यान यावेळी पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत झाला
संघटना वाढवणारे लोकं पक्षात आले आहेत त्यामुळे मिळूनमिसळून काम करुया. सर्वांना मोठी पदे मिळतात असे नाही तर छोटी पदे घेऊन कामाचा आवाका दाखवला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केले.हडपसर येथील महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असेही अजित पवार म्हणाले.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पक्ष प्रवेश करणार्यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.
पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
राज्यात विकासाची कामे करत असताना शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार घेऊन वाटचाल करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
पक्षाचा वर्धापन दिन पुणे – बालेवाडी येथे साजरा केला. दिवसेंदिवस पक्षात येणार्यांची संख्या वाढत आहे. कारण आपले नेतृत्व जनसामान्यांच्या प्रती काम करत आहे. आता हॉल ही कमी पडू लागले असून यापुढे मैदानावर पक्ष प्रवेश घ्यावा लागेल असे सुतोवाच सुनिल तटकरे यांनी केले.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी काम करु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजू नवघरे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार शेखर निकम, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरीचे अजित यशवंतराव, दापोली खेड काँग्रेस पक्ष विधानसभा माजी अध्यक्ष समद मांडलेकर, म्हापुळ जमाते मुस्लीम उपाध्यक्ष मुनीम मुकादम. अशपाक मांडलेकर,नवी मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारीसौ. सविता चव्हाण,सौ. विना राठोड, देवकी जाधव, श्वेता जोशी, योगिता मिक्षा, उज्ज्वला पंडीत, मनिषा बस्ताडे, कल्पना गुप्ता, सरस्वती यादव, नमना कुनसे तसेच पलुस तालुक्यातील माजी उपनगराध्यक्ष पलूस नगर परिषद मा. श्री. अशोक सर्जेराव मोरे, संचालक संग्राम वि का सोसायटी पलूस मा. श्री. विजयकुमार पाडुरंग पाटील, युवा उद्योजक विक्रम सर्वेराय पाटील, मातंग समाज राष्ट्रवादी शरदबंद्रजी पवार गट जिल्हाध्यक्ष विनायक किसान सदामते, युवा नेते संदिप जयसिग साळुंखे, माजी अध्यक्ष, किसान सेल भाजपा, पलूस तालुका शिवाजी कृष्णा सावंत, युवा नेते बुर्ली संतोष काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली दिपक वसंत काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली राजकुमार अण्णा चौगुले, विर सेवा दल, पलूस लालुका राकेश सतीश चौगुले, सांडगेवाडी ग्रामपंचायत सदस्य मनोज चंद्रकांत पवार, सांडगेवाडी तटामुंक्ती समिती अध्यक्ष सुधीर शिवाजी जाधव, पलुस तालुका भाजप माजी संघटक रोहित जलिंदर सूर्यवंशीखानापुर तालुक्यातील माजी सचिव, भाजपा, सांगली जिल्हा पंकज (भैय्या) जोतीराम दबडे, माजी प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, अनुसूचित मोर्चा संदीप (तात्या) मोहन ठोंबरे, माजी उपाध्यक्ष, भाजपा, खानापूर तालुका आबासो जाधव, माजी अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, विटा शहर प्रशांत भस्मे, माजी सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा, सांगली जिल्हा प्रथमेश साळुखे, माजी अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, विटा शहर सुहास कुलकर्णी, माजी अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी, विटा शहर सतीश सुतार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला .