पुणे -आज भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या नूतन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र भेट देण्यात आले. खालापूर ( जि. रायगड ) चे पत्रकार राजीव मुळेकर यांनी त्यांच्या कॅमेर्यात टिपलेल्या छायाचित्राची फ्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी ना. चंद्रकांतदादा पाटील,शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुती चे शहर समन्वयक संदीप खर्डेकर, आ. भीमराव तापकीर,माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,
पत्रकार राजीव मुळेकर, त्यांच्या कन्या सौ.सुरूची मुळेकर / कडलासकर, नात सारा मुळेकर,स्पृहा कडलासकर, पुरूषोत्तम खिरे, संगीता खिरे माधुरी मुळेकर, नितिन भावे, उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांच्या माध्यमातून कार्यालयासाठी ही भेट देण्यात आली.देवेंद्रजींनी सदर फ्रेम धीरजजींना भेट देऊन कार्यालयात लावण्याच्या सूचना केल्या.