आरोपी वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य –आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपींची नावे-१) साहील उर्फ गुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अमर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहु शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे, ८) अॅड. संजय रामभाऊ उडान वय ४३ वर्ष, रा. मुसारी कॉलनी कोथरुड पुणे
पळून जाण्यासाठी वापरलेली वाहने – स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० व महींद्रा एक्सयुव्ही ७०० एम.एच. १२ यु.एफ.८२८२
शरद मोहोळ खून प्रकरणामधील संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. विशेषतः या प्रकरणात पोलिसांनी दोन वकिलांना ताब्यात घेतल्याने वकीलांनी गर्दी केली होती. पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवत पुरेपूर खबरदारी घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, न्यायालयाने सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पुणे- कुख्यात गुन्हेगार शरद हिरामण मोहोळ खुन प्रकरणी गुन्हे शाखेने ८ तासात आरोपींना केले जेरबंदकेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिकृत रित्या दिलेली माहिती अशी कि ,’
कोथरुड मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद हिरामण मोहोळ वय ४० वर्ष रा. सुतारदरा कोथरुड पुणे याच्यावर शुक्रवार दि. ०५/०१/२०२४ रोजी सुतारदरा येथुन त्याचे स्वतःचे घरी जाताना त्याचे सोबतच असलेला त्याचाच साथीदार आरोपी नागे मुन्ना उर्फ साहील पोळेकर रा. सुतारदरा कोथरुड पुणे याने त्याचे दोन साथीदारांसह गोळीबार करुन शरद मोहोळ याचा निर्धन खुन केला होता. सदर बाबत कोथरुड पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. २/२०२४ भा.द.वि.कलम ३०२, ३०७, ३४ आर्म अॅक्ट कलम ३/७ (२५), महा. पोलीस अधिनियमचे कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्त रितेशकुमार पुणे शहर यांनी सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर यांना तात्काळ आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेडे गुन्हे शाखा, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ सुनिल तांबे यांनी गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परीसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व
कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.
दरम्यान खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी वाहनातुन पळुन गेलेले आहेत. व प्राप्त सी.सी.टी.व्ही. विश्लेषणातुन सदरचे आरोपी मुंबई बेगलोर हायवे रोडने सातारा रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे आरोपी निष्पन्न करुन वापरलेल्या चारचाकी वाहन क्रमांकाचा शोध लावुन नमुद गुन्हयातील आरोपी हे खेड शिवापुर टोलनाका पास होवुन पुढे जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी खंडणी विरोधी पथक -१ च गुन्हे शाखा युनिट -१ चे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांना आरोपीच्या शोधाकरीता तात्काळ मुंबई बेंगलोर हायवेने साता-याच्या दिशेने रवाना केले. त्याच बरोबर पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी पोलीस अधिक्षक सातारा यांचेसी संपर्क साधुन सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परीसरात नाकाबंदी लावण्यात आली. त्यानुसार नमुद पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ तपासात निष्पन्न झालेली संशयीत स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० या गाडीचा तब्बल ५ कि. मी. पाठलाग करुन आरोपी नामे १) साहील उर्फ गुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अमर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मिन्त्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहु शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे, ८) अॅड. संजय रामभाऊ उडान वय ४३ वर्ष, रा. मुसारी कॉलनी कोथरुड पुणे यांना स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० व महींद्रा एक्सयुव्ही ७०० एम.एच. १२ यु.एफ.८२८२ या वाहनांसह ताब्यात घेतले. सदर वेळी त्यांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेले ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे ८ मोबाईल हॅन्डसेट, रोखरक्कम असा एकुण २२,३९,८१०/- रु.चा माल हस्तगत केला. नमुद आरोपींनी सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरुन केला असल्याचे प्रथमदर्शनी उघड झालेले आहे.
गुन्हे शाखा पुणे शहर यांनी तात्काळ कारवाई करुन घटनास्थळी गोळीबार करणा-या व त्यांना मदत करणा-या आरोपीना ८ तासाच्या आत ताब्यात घेवुन संवेदनशील खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी हीपोलीस आयुक्त, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, शब्बीर सय्यद, श्रीहरी बहीरट, महेश बोलकोटगी, सोमनाथ जाधव, उल्हास कदम, सुनिल थोपटे, क्रांतीकुमार पाटील सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, राहुल पवार, राजेद्र पाटोळे, पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेन्द्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, अमोल आव्हाड, राजेद्र लांडगे, रविंद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रविण ढमाल, विजय कांबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकरआदींनी केली.
प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी बिराजदार यांनी सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे वकिलांकडून नाराजी व्यक्त वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.दरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी, या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एच.व्ही.निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्वजीत पाटील यांनी, वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात.या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे वकिलांकडून नाराजी व्यक्त वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.
दरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी, या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एच.व्ही.निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्वजीत पाटील यांनी, वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात.त्यासाठी त्यांना आरोपी करण्याची गरज नाही, ते तपासाचा भाग होत नाहीत, असा जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित गुन्ह्यातील वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्यक असल्याचे सांगत ॲड.रवींद्र पवार व ॲड.संजय उढाण या दोन वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

