पुणे-ससून रुग्णालयातील एका समारंभाच्या वेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केली. सदर घटनेची चित्रफीत माध्यमांवर उपलब्ध आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
“नुकताच आपण पोलिस दलाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा केला, आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी मात्र पोलिसांच्या श्रीमुखात मारून संपूर्ण पोलिस दलाचा, त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा अवमान केला. कायदा करणारेच कायदा मोडत असतील तर जगापुढे आपण आपली काय प्रतिमा तयार करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून किमान जनाची नाही तर मनाची लाज वाटून महाराष्ट्र सरकारने आमदार सुनिल कांबळे यांना तातडीने पदमुक्त करावे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. स्वपक्षाच्या आमदाराचा राजीनामा त्यांना घेता येत नसेल तर त्यांनी स्वतः गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, कणव चव्हाण, शेखर धावडे, नितीन पाटोळे, मीनाताई पवार, अजिंक्य पालकर, सुवर्णाताई माने, मृनालताई वाणी, रूपालीताई शिंदे, गणेश नलावडे, नीताताई गलाडे, दीपक कामठे आदि मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्तिथ होते.
आमदार सुनील कांबळेवर कारवाई साठी राष्ट्रवादी ची निदर्शेने
Date:

