Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारताचा हिंदूू पाकिस्तान होऊ देऊ नका:माणूस म्हणून एक यायला हवे _परुळेकर

Date:

दहशतवाद्यांनी देशावर भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. सरकारबरोबर ठाम उभे राहण्याचा काळ आहे. केंद्र सरकार सक्षम आहे. कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला धडा शिकवायला हवा. दहशतवाद्यांना अद्दल घडायला हवी. त्यासाठी कठोरात कठोर शासन करायला हवे. मात्र, या हल्ल्यानंतर समाज माध्यमांवरून सामाजिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून केवळ दहशतवाद्यांचा हेतू साध्य होत आहे. – अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

पुणे :आपण देश म्हणून, माणूस म्हणून एक असायला हवे. समाजातले विविध घटक, वेगवेगळे विचार एकत्र आल्यानेच या देशाची प्रगती झाली. आता भारताचा हिंदूू पाकिस्तान होऊ न देण्याची आपली जबाबदारी आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.


पत्रकार वरुणराज भिडे मित्र परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या ‘वरुणराज भिडे स्मृती’ पुरस्कारांचे वितरण परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, उल्हास पवार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना मुख्य पुरस्कार, प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार (शहर) आणि मिकी घई यांना आश्वासक पत्रकार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) या पुरस्काराने गौरविण्यात आले.’लोकसत्ता’चे प्रतिनिधी दिगंबर शिंदे यांना ‘आश्वासक पत्रकार’ (ग्रामीण) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.परुळेकर म्हणाले, ‘देश म्हणून, माणूस म्हणून आपण एक आहोत. एकमेकांना सोडून जगायचा विचार केला, तरी आपण कोसळून पडू. संविधानाची निर्मिती करणाऱ्या आपल्या पूर्वजांना हे माहीत होते. त्यामुळेच त्यांनी भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ दिला नाही. विविधता, वेगवेगळे विचार एकत्र घेऊन गेल्यामुळेच आपण प्रगती केली. आजच्या काळात सगळ्या समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जायला हवे. भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. पत्रकार, कवी, लेखकांनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
डॉ. शैलेश गुजर यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली. उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद संगोराम यांनी निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्मादाय रुग्णालयांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत मिळावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहराच्या आरोग्य क्षेत्रातील 'लाईफ लाईन' म्हणून ओळखल्या...

२०२२ नुसारच प्रभागरचना:एकनाथ शिंदे

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभागरचना होती,...

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शहरांच्या सर्वांगीण विकासावर...

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...