पुणे दि.३ : कोथरुड आणि कटक मंडळ येथे मुलींच्या विभागीय शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतीगृहासाठी २० ते २५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये किमान २० ते २५ खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.
कोथरुड आणि कटकमंडळ परिसरातील इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा ८४८४८९६६७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

