एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचापं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने समारोप

Date:

पुणे,दि. १ जानेवारी : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे  विश्वशांती गुरूकुल, राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधार्‍याच्या परिसरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाचा समारोप पं उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा.कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, प्रा.ज्योती कराड ढाकणे, प्रा.स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. सुनीता मंगेश कराड  पं. वसंतराव गाडगीळ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. मुकेश शर्मा, डॉ. संजय उपाध्ये  व गिरीश दाते उपस्थित होते.
३१ डिसेंबर रोजी झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२ वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञ कुंडामध्ये काम, क्रोध,लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२४ वर्ष अत्यंत सुखाने, सामाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
तसेच पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाच्या प्रांगणात तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवता भवनाची स्थापना करण्याचा संकल्प घेण्यात आला. हा संकल्प माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि समविचारी आंबेडकरवादी बुध्दप्रेमी यांनी घेतला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन जगावे. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पसायदानाचा बोध घेऊन सर्वांनी विश्वशांतीसाठी कार्य करावे. भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत.”
“भारतीय संगीत हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपलं जीवन सूरमय व तालमय झाले पाहिजे. ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने थोडेफार तरी संगीत शिकावे. युवकांनी पाश्चात्य संगीताबरोबरच भारतीय संगीत शिकणे गरजेचे आहे.”
प्रख्यात ध्रुपद संगीत गायक सुप्रिया माईत्रो, प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, श्रीमती कल्याणी बोंद्रे  आणि सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट यांनी आपली कला सादर केली.
या संगीत महोत्सवात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कथक नृत्य सादर केले.
निसर्गरम्य व सुंदर परिसरात झालेल्या संगीत महोत्सावात  मारिया लिन ओब्रे, निसर्ग पाटील, पखवाज वादक पं. उध्दवबापू आपेगावकर व शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी यांनी आपली कला सादर केली.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण व सूत्रसंचालन केेले.
प्रा.ज्योती कराड ढाकणे यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...