पुणे- महावितरण चे काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला आणि अन्य ३ कामगार गंभीर भाजले या घटने नंतर तब्बल २२ दिवसांनी सिंहगड रोड पोलिसांनी संबधित कामगार कंत्राटी होते , त्यांच्या कंत्राटदार कंपनीच्या म्हणजे मे.आर्या ट्रान्सकेअर, धायरी, पुणे या कंपनीचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या संचालकांची नावे देण्याचे पोलिसांनी का टाळले असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०८/१२/२०२३ रोजी ०२/३० वा. शिवाजी महाराज पुतळ्या जवळील घुले नगर, वडगाव बुद्रुक, पुणे येथील महावितरणच्या लाईट डी.पी. क्र.४६७७८२६, वडगाव, पुणे येथे सिंहगड रोड पो स्टे अ. मयत रजि. नं. २२२/२०२३, सीआरपीसी १७४ अन्वये मयताचे झाले तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, यातील नमुद मे. आर्या ट्रान्सकेअर, धायरी, पुणे या कंपनीचे संचालक व इतर यांनी त्यांचेकडे काम करणारे कामगार १. सागर शांतप्पा पुजारी २. गड्डेप्पा आप्पासाहेब गुरव ३. सागर प्रेमनाथ शिंदे यांना विद्युत डीपीचे दुरुस्तीचे काम करणेसाठी लागणारी सुरक्षिततेची पर्याप्त साधने न पुरविता, तसेच कामगार काम करीत असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे, अगर कसे याबाबतची खात्री न करता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून, यातील कामगारांना महावितरणच्या लाईट डीपीचे मेंटनन्सचे काम करण्यास सांगुन, ते काम करीत असताना, त्यामध्ये सागर शांतप्पा पुजारी, वय- २६ वर्षे, रा. दबाडी वस्ती, वडगाव-बुद्रुक, पुणे यास शॉक लागल्याने तो गंभीररित्या जखमी होवुन, त्याच्या मृत्युस कंपनीचे संचालक व इतर कारणीभुत होवुन, इतर कामगार १. गड्डेप्पा आप्पासाहेब गुरव २. सागर प्रेमनाथ शिंदे यांचे जीवाला धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहा पोलीस निरीक्षक, दिपक कादबाने ९६२३४५९०९७ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

