जागतिक समताधर्माची जुळणी केल्याने अण्णाभाऊंचे साहित्य वैश्विक

Date:

अण्णाभाऊंच्या सहवासात” पुस्तकाचे प्रकाशन

पुणे २५ फेब्रुवारी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघातर्फे आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित अण्णाभाऊंच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन अण्णाभाऊंचे मित्र सुप्रसिद्ध चित्रकार नाथ वैराळ यांच्या पत्नी सौ. कुसमताई वैराळ यांच्या हस्ते करण्यात आले. या नगरपालिकेत सफाई कामगार होत्या.
या प्रसंगी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, बिहारच्या भागलपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता साहित्यिक लखनलाल सिंह आरोही, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दादासाहेब सोनावणे व शाहिर जाधव हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,”अण्णाभाऊ साठे यांनी भारतातील प्रगतीशिल साहित्य परंपरेचे ओळख करून देऊन प्रेमचंद पासून तर शाहीर लुधियानी पर्यंत या लेखकांनी पुरोगामी विचारांची क्रांती साहित्यात केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे देखिल याच परंपरेचे जागतिक कीर्तीचे महत्वाचे सहित्यीक होते. त्यांच्या कादंबर्‍या आणि कथा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झाले आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,”संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून माझ्या त्यांच्याशी संबध आला. त्यांचा कलापथकांचे पप्रययोग आणि प्रसार अहमदनगरजिल्ह्यात करण्यात माझा सहभाग होता. फकीरा चित्रपटाच्या वेळी अकोला गावात मी आणि माझे सहकारी संपूर्णपणे अण्णाभाऊंच्या बरोबर होतो. चित्रकार एकनाथ वैराळ अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अण्णाभाऊंच्या बरोबर होते. शेवटचा टाटा करीत अण्णाभाऊंनी जो निरोप घेतला तो देखील त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.”
हे पुस्तक दलित सेवक संघाचे अध्यक्ष आणि मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्त मा. दादासाहेब सोनावणे यांना अर्पण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नटश्रेष्ठ कुमार अहेर यांनी केले.
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाल.
या कार्यक्रमात शाहीर जाधव, शाहीर गायकवाड, लेखिका सुमा लोंढे, चार्लीन चापलीनची भूमिका करणारे आयुष्यमान वनप्रभ, बौद्ध नेते अशोक प्रियदर्शी, सौ. सुशील सोनग्रा, आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मराठी जेंझीसाठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

*तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न मुंबई, दि....

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा आवश्यक उपाययोजना...

“सत्तेच्या विरोधकांना ‘नक्षली’ ठरवणे लोकशाहीवर आघात”; राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात — गोपाळदादा तिवारी

“सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी”; ‘दिमागी...

अमिताभ बच्चन यांचा मुंबईत मोठा रिअल इस्टेट व्यवहार; ३ मजले भाड्याने, ५ वर्षांत २१.८८ कोटींची कमाई

अंधेरी पश्चिममधील ‘सिग्नेचर’ इमारतीतील ८,४२८ चौ. फुटांची जागा ट्रूनॅटिव्हला;...