पुणे : आकाशवाणी पुणे ही भारतातील अनेक जुन्या आकाशवाणी केंद्र मधील एक महत्त्वाचे आकाशवाणी केंद्र आहे. तसेच त्यांचे कार्यक्रम हेही खूप प्रसिद्ध आहेत. या केंद्रावरील अनेक प्रकारचे कार्यक्रम हे नक्कीच ऐकण्यासारखे व प्रबोधनात्मक असतात. या कार्यक्रमामधून अनेक मोठमोठे कलाकार ही तयार झालेले आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सहभाग व मराठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाढलेला वापर यामुळे आकाशवाणी पुणे हे केंद्र नक्कीच अत्यंत चांगले काम करत होते. यामुळे या केंद्राला महसूल ही चांगला मिळत होता. तथापि गेल्या काही महिन्यांपासून या आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम हे अत्यंत सुमार दर्जाचे तसेच स्थानिक कलाकारांना न घेता केलेले आहेत. याबरोबर पुणे आकाशवाणी केंद्र हे मुंबई, दिल्ली किंवा इतर केंद्राचे केंद्राचे कार्यक्रम प्रसारण करणारे केंद्र असल्याचे सध्या अनेक श्रोत्यांना जाणवत आहे. यामुळे अनेक श्रोते तक्रारी करत आहेत. अनेक श्रोत्यांनी आकाशवाणी पुणे च्या कार्यक्रम बाबत लेखी तक्रारी डॉ गोऱ्हे यांना दिल्या आहेत. याची तात्काळ दाखल डॉ गोऱ्हे उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद यांनी घेतली. त्यांनी तात्काळ केंद्रीय माहिती व जनसंपर्क मंत्री श्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश जी बैस, मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी खालील प्रमाणे विनंती केली आहे. यात
- आकाशवाणी पुणे केंद्र मध्ये ज्याप्रकारे जुने कार्यक्रम आखले जात होते त्याच धर्तीवर नवीन कार्यक्रम आखावेत.
- हे कार्यक्रम स्थानिक नवीन कलाकारांना घेऊन करण्यात यावेत.
- आकाशवाणीा पुणे केंद्र हे फक्त ईतर केंद्रांचे ब्रॉडकास्टिंग केंद्र म्हणून न बनता स्थानिक लोक व सांस्कृतिक कलांशी त्यांचे नाते टिकुन रहावे यासाठी त्यांनी आपले स्वतःचे कार्यक्रम तयार करण्यास कर्मचारी , निधी व अनुमती असावी.
- तसेच प्राईम वेळेत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम मराठी भाषेमध्ये घेण्याबाबत सूचित करावे
- राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचेच कार्यक्रम फक्त पुणे आकाशवाणी केंद्रावरून ब्रॉडकास्ट करावेत.
- आकाशवाणी पुणे च्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकार व महनीय व्यक्तींना जास्तीत जास्त सहभाग असावा.
वरील प्रमाणे सूचना आकाशवाणी पुणे केंद्रातील अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती लेखी निवेदनद्वारे विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

